• Download App
    पवारांना आलेल्या धमकीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; औरंगजेबाचे उदात्तीकरण करून कायदा - सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांनाही इशारा The Chief Minister took notice of the threat to Pawar

    पवारांना आलेल्या धमकीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; औरंगजेबाचे उदात्तीकरण करून कायदा – सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांनाही इशारा

    प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या संदर्भात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पण त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना शरद पवारांच्या सुरक्षेसंबंधी सूचना दिल्या आहेत. The Chief Minister took notice of the threat to Pawar

    त्याच वेळी ट्विटर वरून त्यांनी ठाकरे गटाला ही इशारा दिला आहे.

    मुख्यमंत्र्यांचे ट्विट असे :

    ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

    शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले वातावरण बिघडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरु आहे.

    सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत, त्यातून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. औरंगजेब, टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करुन धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. आपल्या राजकारणासाठी महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान हाणून पाडले जाईल.

    The Chief Minister took notice of the threat to Pawar

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!