प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४ हजार ६४० सदनिका आणि १४ भूखंडांच्या संगणकीय सोडतीचा दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ करण्यात आला. The Chief Minister started the lottery of 4640 Mhada houses of Konkan Mandal
सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नांना बळ आणि आकार देण्याची जबाबदारी म्हाडा चांगल्यारितीने पार पाडत आहे. अनेक कुटुंबांचे गृहस्वप्न पूर्ण होण्याचा आजचा दिवस आहे. त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
म्हाडाची गरजूंना घरे देण्याची कार्यप्रणाली कौतुकास्पद आहे. सोडतीला मिळालेला प्रतिसाद पाहिला तर म्हाडावरील विश्वास सिद्ध होतो. लवकरच पंतप्रधान आवास योजनेत अत्यल्प उत्पन्न गटासाठी खोणी, शिरढोण, विरार बोळींज, गोठेघर येथे सदनिका देणार आहोत. त्यासाठी केंद्राची मंजुरी मिळाली आहे. केंद्राचे दीड लाख, आणि राज्य शासनाचे एक लाख अनुदान त्यासाठी मिळणार आहे. या माध्यमांतून अनेकांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या सोडतीच्या कार्यक्रमात केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, किरण सरनाईक, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंग, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर उपस्थित होते.
The Chief Minister started the lottery of 4640 Mhada houses of Konkan Mandal
महत्वाच्या बातम्या
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन याच महिन्यात पीएम मोदींना भेटण्याची शक्यता, पॅसिफिक आयलँड लीडर्स मीटमध्ये ठरवणार भविष्यातील रणनीती
- द फोकस एक्सप्लेनर : इम्रान खान यांना का झाली अटक? जाणून घ्या काय आहे अल-कादिर ट्रस्ट केस? अटकेमुळे पेटून उठला अवघा पाकिस्तान
- DRDO शास्त्रज्ञाच्या पोलीस कोठडीत वाढ, हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप
- WATCH : पीक कर्जासाठी सिबिल स्कोर मागणाऱ्या बँकेविरुद्ध FIR दाखल करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश