• Download App
    मुख्यमंत्र्यांचा "टोमणे बॉम्ब" अजितदादांच्या दिशेने आला, पण त्यांनी तो शिताफीने टाळला!! The Chief Minister sarcasm bomb came in the direction of Ajit Pawar

    पहाटेचा शपथविधी : मुख्यमंत्र्यांचा “टोमणे बॉम्ब” अजितदादांच्या दिशेने आला, पण त्यांनी तो शिताफीने टाळला!!

    प्रतिनिधी

    मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर मुख्यमंत्र्यांनी कालच्या बीकेसीतील या सभेत जोरदार टोमणा हाणला, पण त्यावर बोलण्यात मला अजिबात रस नाही, असे सांगून अजित पवार यांनी तो झटकला. The Chief Minister sarcasm bomb came in the direction of Ajit Pawar

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी घेतलेल्या सभेत भाजपवर जोरदार शरसंधान साधताना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी अचानक पहाटे घेलेल्या शपथविधीचा उल्लेख केला. त्यावर आज अजित पवारांना प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेवर बोलण्यात मला रस नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

    – पुलाखालून बरेच पाणी वाहिले

    त्यावेळी पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर आज तुम्हीही नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या मांडीला मांडी लावून बसला असता, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस आणि भाजपला लगावला होता. पण ते अजित पवारांवर देखील शरसंधान होते यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार येऊन आता 2.5 वर्षे झाली आहेत. या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आता जो शपथविधी सकाळी 8.00 वाजता झाला त्याला पहाटेचा शपथविधी असे कसे म्हणता येईल??, त्यामुळे यावर आता मला काही बोलायचे नाही. योग्य वेळ आली की मी बोलेन, असे अजित पवार म्हणाले.

    Ajit Pawar – Jarandeshwar : जरंडेश्वर कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या किरीट सोमय्यांची ईडी कडे मागणी!!

    – वेळ आल्यावर बोलेन, पण वेळ येणार केव्हा??

    मला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा मी बोलेन, आता मला ते सांगावेसे वाटत नाही. जेव्हा बोलावेसे वाटत नाही, तोपर्यंत अजित पवार बोलणार नाही. मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी आपण बोलणार असल्याचे सांगितले आहे. ते जर बोलले नसते, तर मुख्यमंत्री का बोलत नाहीत??, असा काहींनी त्याचा अर्थ काढला असता. ते राज्याचे प्रमुख आहेत त्यांनी काय भूमिका मांडायची हे त्यांचे मत आहे. त्यामुळे ते जे काही बोलले त्यावर प्रतिक्रिया देण्यात रस नाही, असे सांगून अजित पवार यांनी त्यावर सविस्तर उत्तर देण्याचे टाळले.

    The Chief Minister sarcasm bomb came in the direction of Ajit Pawar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ‘सर्व भारतीय वैमानिक परतले आहेत’, ऑपरेशन सिंदूरवर एअर मार्शलचे मोठे विधान

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    इंदिरा गांधींची आठवण काढून काँग्रेसने मोदींना टोचले; पण शशी थरूर + चिदंबरम यांनी मोदींच्या निर्णयाला वाखाणले!!