• Download App
    Babasaheb Ambedkar Jayanti 2021 holiday:मोदी सरकार कडून 'भीमवंदना': 14 एप्रिल सार्वजनिक सुट्टी जाहीर ; संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना ! The Centre has announced a public holiday on April 14 this year on account of the birth anniversary of Dr BR Ambedkar

    Babasaheb Ambedkar Jayanti 2021 holiday:मोदी सरकार कडून ‘भीमवंदना’: 14 एप्रिल सार्वजनिक सुट्टी जाहीर ; संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना

    • डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीदिनी देशातील सर्व कार्यालयांना सुट्टी, केंद्राची घोषणा

    • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंतीभारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा 130 वी जयंती आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही बाबासाहेबांच्या जयंतीवर कोरोना व्हायरसचे सावट आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदाची भीम जयंती घरातच साजरा करण्याचं आवाहन केलं जात आहे. 

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची येत्या 14 एप्रिलला 130 वी जयंती आहे. यानिमित्त महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये या दिवशी सुट्टी असते. परंतू आता केंद्र सरकारने या जयंतीचे औचित्य साधून देशभरामध्ये हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केला आहे.

    कामगार, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालयाने याचे नोटिफिकेशन जारी केले आहे.The Centre has announced a public holiday on April 14 this year on account of the birth anniversary of Dr BR Ambedkar.

    यामुळे यंदापासून या दिवशी सरकारी कार्यालयांसह औद्योगिक आस्थापनांमध्ये सार्वजनिक सुटी दिली जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने 14 एप्रिल 2021 रोजी सार्वजनिक सुटी घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने बुधवार, 14 एप्रिल, 2021 रोजी सार्वजनिक सुटी घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये भारतामधील औद्योगिक आस्थापनांसह सर्व केंद्र शासकीय कार्यालयांमध्ये Negotiable Instruments Act, 1881 च्या सेक्शन 25 च्या अधिकारानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

    स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला होता.

    प्रचंड बुद्धिमत्ता, समाजासाठी असीम त्याग करणारे, दलित समाजाला हक्क मिळवून देणारे, महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, मंदिर सत्याग्रह, शेतकऱ्यांचा कैवारी, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिलांसाठी कार्य, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग अशा कितीतरी गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या.

    समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला. शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र दिला.

    The Centre has announced a public holiday on April 14 this year on account of the birth anniversary of Dr BR Ambedkar.

    Related posts

    India-Pakistan : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    भारत-पाक तणावात राफेल उत्पादक कंपनीचे शेअर्स वधारले; डसॉल्ट एव्हिएशनचे शेअर्स 2 आठवड्यांत 8% वाढले