तो अट्टल चोर. दोनदा तुरुंगात गेला. जामिनावर सुटला. तरी चोरीची सवय काही जाईना. अखेरीस तो पुन्हा अडकलाच. The burglar who broke into the bungalow of former MP Suresh Kalmadi was caught by the police after nine years.
प्रतिनिधी
पुणे : माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या एरंडवणा (पुणे) येथील बंगल्यातून वाहनचोरी करणारा व एकूण १२८ वाहन चोरीची कबुली देणारा सराईत गुन्हेगार गेली ९ वर्षे पोलिसांना सापडत नव्हता. अखेरीस तो पुण्यालगतच्या नऱ्हे येथे येणार असल्याची माहिती खबऱ्यांनी दिली आणि हा सराईत चोरटा गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाच्या जाळ्यात आला.
राजू बाबूराव जावळकर (वय ५५, रा. खानापूर, ता. हवेली) असे या सराईत वाहन चोरट्याचे नाव आहे. पुणे पोलिसांनी त्याला यापूर्वी २००९ मध्ये अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून पुणे जिल्ह्यातील अनेक चारचाकी व ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले होते. या गुन्ह्यात शिक्षा होऊन त्याने २ वर्षे तुरुंगात काढली. पणे तिथून सुटल्यानंतरही तो पुन्हा चोऱ्या करू लागला.
राजू जावळकर हा पूर्वी नगरला राहत होता. तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीच्या दोन गुन्ह्यांत तो ‘वाँटेड’ होता. नगरमधून पळून आल्यानंतर तो पुण्यात स्थायिक झाला. जावळकर आणि त्याच्या दोन साथीदारांना पुणे पोलिसांनी जानेवारी २०१२ मध्ये अटक केली होती.
त्यावेळी त्यांनी पुणे परिसरातून १२८ वाहने चोरल्याची कबुली दिली होती. खासदार सुरेश कलमाडी यांच्या बंगल्यातून चोरलेल्या वाहनाचाही यात समावेश होता. या प्रकरणी जामीन मिळवून तो बाहेर आला. त्यानंतर तो पुन्हा पसार झाला. तेव्हापासून त्याचा शोध चालू होता.
अखेरीस दरोडा व वाहनचोरी विरोधी प्रतिबंध पेट्रोलिंग करणारे पोलीस शिपाई श्रीकांत दगडे यांना घरफोडीच्या गुन्ह्यात १० वर्षांपासून फरार असलेला आरोपी जावळकर नऱ्हे येथील पारी कंपनीजवळ येणार असल्याची खबर मिळाली. त्यांनी याची माहिती वरिष्ठांना दिली.
त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक शाहीद शेख, अंमलदार गणेश पाटोळे, श्रीकांत दगडे यांनी सापळा रचून जावळकरला पकडले. पुढील कारवाईकरिता त्याला नगरच्या तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
The burglar who broke into the bungalow of former MP Suresh Kalmadi was caught by the police after nine years.
महत्त्वाच्या बातम्या
- Bhawanipur By-polls : बंगालमध्ये तृणमूलचा पुन्हा हिंसाचार, भवानीपूरमध्ये भाजचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर तृणमूलच्या गुंडांचा हल्ला
- राज्यसभेसाठी भाजपचे केंद्रीय मंत्री सोनोवाल यांची आसाममधून, तर सेल्वागणबथी यांची पुदुचेरीतून बिनविरोध निवड
- Dombivali Gang Rape : डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखी 2 आरोपींना अटक, आतापर्यंत 33 पैकी 32 नराधम जेरबंद
- ‘भारत बंद’ सुरू असताना दिल्ली-सिंघू सीमेवर एका शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू, दिल्ली-गाझीपूर सीमा 10 तासांनी खुली