• Download App
    बैलाची उपमा पवारांची नेहमीच आवडती, पण त्यांच्याच उमेदवारांसाठी फार घातकी!! The bull analogy is always Pawar's favourite, but very dangerous for his own candidates

    बैलाची उपमा पवारांची नेहमीच आवडती, पण त्यांच्याच उमेदवारांसाठी फार घातकी!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपल्या शेती विषयाच्या आवडीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले  जातात. त्यांनी आपल्या शेतीविषयक आवडीतूनच केंद्रात यूपीए सरकारमध्ये कृषिमंत्री पद स्वीकारले होते, असे त्यांचे समर्थक सांगतात. त्यांच्या शेतीविषयक आवडीतूनच त्यांच्या भाषणाच्या वेगवेगळ्या खुबीही समोर येतात. The bull analogy is always Pawar’s favourite, but very dangerous for his own candidates

    कृषिप्रेमी शरद पवार यांच्या भाकरी आणि बैलाच्या उपमा फारच आवडत्या आहेत. भाकरी फिरवणे हा शब्दात पवारांनी महाराष्ट्रात रूळवला. पण अजितदादांनी शरद पवारांना रिटायर व्हा, असा सल्ला दिल्यानंतर शरद पवारांनी बैलाची उपमा देऊन कोणाला रिटायर करण्याचा सल्ला दिला होता?, याचे उदाहरण काल पुरंदरचे माजी आमदार दादा जाधवराव यांच्या रूपाने सोशल मीडियावर फिरले. दादा जाधवरावांना उद्देशून शरद पवार 2004 च्या पुरंदरच्या सभेत, बैल म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवायचा असतो, असे म्हणाले होते.

    पण ज्या नेत्याला शरद पवार म्हातारा बैल म्हणाले, ते दादा जाधवराव एकटेच नेते नव्हते. त्यानंतरही 2009 च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरातल्या सभेत शरद पवारांनी त्यांचेच एकेकाळचे कट्टर समर्थक असलेल्या पैलवान माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांना देखील बैल म्हणून हिणवले होते. “आता बैल म्हातारा झाला आहे. नवीन खोंड शोधा,” असे शरद पवार त्या भाषणात म्हणाले आणि कोल्हापूरची जनता संतापली. जनतेने सदाशिवराव मंडलिक यांचा संभाजी राजे यांच्याविरुद्ध विजय घडवून आणला होता. त्या निवडणुकीत शरद पवारांनी धनंजय महाडिक यांना डावलून संभाजीराजांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली होती, तर सदाशिवराव मंडलिक हे अपक्ष उमेदवार होते आणि शिवसेनेचे उमेदवार विजय देवणे होते.

    पण शरद पवार सदाशिवराव मंडलिकांना शरद पवारांनी म्हातारा बैल म्हणून हिणवले म्हणून कोल्हापूरच्या जनतेने जिद्दीने त्यांचा विजय घडवून आणला होता. पवारांच्या म्हाताऱ्या बैलाच्या उपमेची राजकीय किंमत संभाजीराजांना चुकवावी लागली होती. त्यामुळे शरद पवारांची बैलाची उपमा कितीही आवडती असली तरी त्यांच्याच उमेदवारासाठी मात्र घातक ठरली होती.

    अजितदादांनी शरद पवारांना 5 जुलै च्या भाषणात आता वय झाले. रिटायर होणार की नाही??, या सभ्य भाषेत तरी विचारले होते. पण शरद पवार मात्र वयोवृद्ध नेत्यांचा बैल म्हणून बाजार दाखवायची किंवा नवा खोंड आणायची भाषा वापरत होते. याचा काव्यगत न्याय सभ्य भाषेत अजितदादांनी त्यांना दाखवून दिल्याचे सोशल मीडियावर फिरत आहे..

    The bull analogy is always Pawar’s favourite, but very dangerous for his own candidates

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा