• Download App
    फेक न्यूजचा पर्दाफाश करण्याचा दावा करणाऱ्यांचाच धादांत खाेटेपणाThe boldness of those who claim to expose fake news

    फेक न्यूजचा पर्दाफाश करण्याचा दावा करणाऱ्यांचाच धादांत खाेटेपणा, अल्ट न्यूजचे संस्थापक प्रतिक सिन्हा आणि मोहम्मद झुबेर शांततेच्या नाेबेल पारिताेषिकाच्या शर्यतीत असल्याची फेक न्यूजच

    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली : फेक न्यूजचा पर्दाफाश करणाऱ्यांकडूनच धादांत खाेटी बातमी पसरविली जात आहे. अल्ट न्यूजचे संस्थापक प्रतिक सिन्हा आणि माेहम्मद झुबेर शांततेच्या नाेबेल पारिताेषिकाच्या शर्यतीत असल्याची फेक न्यूज पसरली आहे. विशेष म्हणजे मराठीतील अनेक प्रतिष्ठित माध्यमांनी ही बातमी दिली असून त्याची काेणतीही शहानिशा केलेली नाही. The boldness of those who claim to expose fake news

    शांततेच्या नोबेल पुरस्कारांची शुक्रवारी घोषणा होणार आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लोमध्ये ही घोषणा केली जाणार आहे. रायटर्सच्या सर्वेक्षणानुसार शांततेच्या नोबेल पुरस्कारांसाठी आघाडीवर असलेल्या नावांमध्ये भारतातील फॅक्ट चेक करणार वेबसाइट अल्ट न्यूजचे संस्थापक प्रतिक सिन्हा आणि मोहम्मद झुबेर यांच्या नावांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. पण मुळात टाइम्स मॅगझिनने राॅयटरच्या एका वृत्ताचा आधार घेतला आहे. पण विशेष म्हणजे राॅयटरच्या  वृत्तात काेठेही सिन्हा आणि झुबेर यांचा उल्लेख नाही.

    टाइममधील हा लेख  सान्या मन्सूर या जम्मू काश्मीरमधील एका पत्रकाराने लिहिला आहे. त्यामध्ये या पुरस्कारांसाठी झुबेर आणि सिन्हा यांचे नामांकन असल्याबद्दल खाेटे लिहिले आहे.  पीस रिसर्च इन्स्टिटय़ूट ओस्लो (पीआरआयओ) च्या शॉर्टलिस्टमध्ये त्यांची नावे असली तरी ती मुळात विशलिस्ट आहे. पीआरआयओचे संचालक हेन्रिक उर्डल यांनी निवडलेल्या पाच उमेदवारांची नावे दिली आहेत त्यामध्ये या दाेघांचाही उल्लेख नाही. नामांकनाच्या निकषांची पूर्तता करणारी कोणतीही व्यक्ती नामनिर्देशन सादर करू शकते. तथापि, नामनिर्देशित व्यक्तींची नावे आणि नामांकनांबद्दलची इतर माहिती 50 वर्षे उघड करता येत नाही. त्यामुळे या दाेघांची नावे नाेबेल पारिताेषिकासाठी असल्याचे धादांत खाेटे वृत्त पसरविले गेले.

    प्रतिक सिन्हा आणि मोहम्मद झुबेर हे तथाकथित फॅक्ट चेकिंग वेबसाइट अल्ट न्यूजचे संस्थापक आहेत. मोहम्मद झुबेर यांना एका ट्विट प्रकरणी अटक करण्यात आली होती.

    The boldness of those who claim to expose fake news

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!