• Download App
    थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक विधानसभेत मंजूर; राष्ट्रवादीच्या राजकीय वर्चस्वाला धक्का!! The bill for electing mayor directly from the people was passed in the assembly

    थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक विधानसभेत मंजूर; राष्ट्रवादीच्या राजकीय वर्चस्वाला धक्का!!

    प्रतिनिधी

    मुंबई : ग्रामीण आणि निमशहरी भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय वर्चस्वाला धक्का देणारे महत्त्वाचे विधेयक विधानसभेने आज बहुमताने मंजूर केले आहे. The bill for electing mayor directly from the people was passed in the assembly

    नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे अध्यक्ष हे थेट जनतेमधून निवडण्याबाबतचे विधेयक सोमवारी विधानसभेत बहुमताने मंजूर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक मांडले. या विधेयकाच्या चर्चेत विरोधीपक्ष नेते अजित पवार, सदस्य छगन भुजबळ, जयंत पाटील, संजय कुटे, पृथ्वीराज चव्हाण, हरिभाऊ बागडे, नितेश राणे, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात आदी सदस्यांनी मत मांडले.

    राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सदस्यांनी संबंधित विधेयकातील दुरुस्तीवर जोरदार शासन ज्ञान साधले. मात्र शिंदे – फडणवीस सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिले. या संदर्भात उत्तर देतांना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयकांत १९७४ पासून सुधारणा केली जात आहे. राज्य शासन जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. नगराध्यक्षाला वाढीव अधिकार देण्याबाबत राज्यशासन सकारात्मक असून त्यानुसार आवश्यकता असल्यास विधेयकात फेरबदल करता येईल. पारदर्शक कारभारासाठी जनतेतून नगराध्यक्षाची निवड करण्यासंदर्भातील विधेयक महत्त्वपूर्ण आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

     9000 ग्रामपंचायतींचा ठराव

    थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. या निर्णयाच्या समर्थनात राज्यातील 9000 ग्रामपंचायतींनी ठराव केला असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

    The bill for electing mayor directly from the people was passed in the assembly

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस