प्रतिनिधी
पुणे : दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने शर्यतींना अटी-शर्तींवर परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा खिलार बैलांना महत्व आले आहे. शर्यतीचे शौकीन खिलार बैल खरेदीसाठी गडबड करु लागले आहेत. खरिपातील नुकसान अन् यंत्रावर आधारित शेती यामुळे ज्या बैलांना 20 ते 30 हजार सुद्धा कोणी द्यायला तयार नव्हते त्याच बैलांच्या किंमती आता लाखोंच्या घरात गेल्या आहेत. पुणे, नगर, कोल्हपूर, सांगलीमध्ये एका निर्णयाचा परिणाम काय होऊ शकते याचा अनुभव सध्या खिलार बैलांचे पालनकर्ते घेत आहेत. टीव्ही ९ मराठीने हे वृत्त दिले आहे. The ban on bullock cart races was lifted and the cost of thousand rupees of the bull has reached lakhs
बैलगाडीच्या शर्यतीमध्ये खिलार बैलजोडीलाच अधिकचे महत्व आहे. त्याशिवाय ही शर्यत पारच पडू शकत नाही. जातिवंत खिलार बैलांची किंमत 20 ते 30 हजार रूपये होती, ती किंमत असलेल्या बैलांसाठी आता लाखो रुपये मोजण्याची तयारी ठेवली जात आहे. सर्वाधिक मागणी ही कोल्हापूर, पुणे, नगर जिल्ह्यांतुन होत आहे. बैलगाड्यांची शर्यत हा खरा शौकिनांमुळे चर्चेतला विषय आहे. यातच कमी शेतकऱ्यांकडेच आता अशी जातिवंत बैल आहेत. त्यामुळे मागणी करणाऱ्यांची संख्या एका रात्रीत वाढली असून हे दर कुठपर्यंत जातात याचीच प्रतिक्षा आता विक्रेत्यांनाही असणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जे लॅाकडाऊन करण्यात आले त्याचा परिणाम शेती व्यवसयावर कमी परंतू जनावरांच्या खरेदी-विक्रीवर अधिक झाला होता. आठवडे बाजार हे बंद असल्याने खरेदी-विक्री पूर्णपणे बंद होती. शिवाय आता शेती मशागत आणि इतर कामांसाठी यंत्राचाच वापर वाढला आहे. त्यामुळे जनावरांच्या विशेषत: बैलाचे बाजारांवर याचा सर्वाधिक परिणाम झाला होता. त्या काळात मिळेल त्या किमतीमध्ये खिलार जनावरांची विक्री केली होती. शिवाय खिलार बैलांचे संगोपन हे तसे खर्चीक असल्याने विक्रीवरच भर दिला जात होता.
दुपटीने दरवाढ अपेक्षित
बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठून आता कुठे दोनच दिवसांचा कालावधी लोटला आहे. असे असतानाच बैलांच्या मागणीत वाढ झाली आहे. किंमतीचा विचार न करता केवळ खिलार जोड आहे का? एवढीच विचारणा केली जात आहे. अजून कुठे बैलगाडी शर्यंतीचे आयोजन झालेले नाही. मात्र, या शर्यतीला सुरवात होताच पुन्हा दुप्पट दराने खरेदी करण्याची तयारी ही शौकिनांची राहणार असल्याचे गोवंश पालक यांनी सांगितले आहे. ज्यांच्याकडे खिलार जनावरे आहेत त्यांच्याकडे शौकिनांनी चौकशीला सुरवात केली आहे. आता ही मागणी अशीच वाढत जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
The ban on bullock cart races was lifted and the cost of thousand rupees of the bull has reached lakhs
महत्त्वाच्या बातम्या