वृत्तसंस्था
पतियाळा : एकीकडे महागाईचा बाण गगनापर्यंत गेला असताना सर्वसामान्यांचे जीवन होरपळत आहे. पेट्रोल डिझेल, गॅस सिलेंडर, धान्य, भाजीपाला, फळे सगळ्यांच्याच महागाईचे चटके सर्वसामान्य जनता भोगत आहे. पण राजकीय पक्ष मात्र चित्रविचित्र आंदोलने करून सरकारचे त्याकडे लक्ष वेधण्यापेक्षा आपल्याच प्रसिद्धी मध्ये मश्गुल झालेले दिसत आहेत. The arrow of inflation in the sky; Sidhu’s climb on the elephant
महागाई विरोधात आंदोलन करणाऱ्या एकाही नेत्याला एकाही राजकीय पक्षाच्या नेत्याला किंवा त्यांच्या निकटवर्तीयांनी महागाईचा झटका सहन करावा लागलेला नाही. तरी देखील चित्रविचित्र आंदोलन करण्यात त्यांचे नेते आघाडीवर आहेत. कोणी रस्त्यावर चुली मांडून भाकरी थापत आहे. कोणी घोड्यावरून उधळताना दिसले आहे.
पण आता त्यांच्या सगळ्यांवर कळस चढवत सध्या कुठल्या पक्षात आहेत हे माहिती नाही असे नेते नवज्योत सिंग सिद्धू हे महागाई विरोधात हत्तीवर चढले होते. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना जो “प्रचंड विक्रम” केला, त्याबद्दल खरे म्हणजे आम आदमी पार्टी किंवा भाजप यांनी त्यांची त्याच वेळी हत्तीवरून मिरवणूक काढायला हवी होती!! परंतु या दोन्ही पक्षांनी सिद्धूंची हत्तीवरून मिरवणूक काढली नाही. याची खंत त्यांच्या मनात राहिल्याने शेवटी स्वतः सिद्धूंनीच आता महागाईच्या विरोधात हत्तीवर चढाई केली आहे.
माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या पतियाळा शहरात महागाईविरोधी आंदोलनात ते खरोखरच्या हत्तीवर चढून बसले होते. त्यांच्या हातात या वेळी महागाई निर्देशांक कसा वाढतो आहे असा बाण वरच्या दिशेने चालल्याचे चालल्याचा कापडी फलक होता. एरवी कोणत्याही प्रचंड पराक्रम करून आलेल्या माणसाची हत्तीवरून मिरवणूक काढली जाते. जनता जल्लोषात या मिरवणूकीत सामील होते. परंतु, पंजाब मध्ये आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या नेतृत्वाखाली काँग्रेस बुडवून दाखवली म्हणून कदाचित ते स्वतः हत्तीवरून मिरवून घेत असावेत, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
The arrow of inflation in the sky; Sidhu’s climb on the elephant
महत्वाच्या बातम्या
- J. P. Nadda : काँग्रेस ना राष्ट्रीय, ना भारतीय उरलीय फक्त “भाई बहन की पार्टी”!!; भाजप राष्ट्रीय अध्यक्षांचा हल्लाबोल
- Supreme Court : प्रफुल्ल पटेलांना धक्का; फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटविले!!; बीसीसीआयची अशीच केली होती “सफाई”
- ज्ञानवापीत शिवलिंग : वजूखान्याचा “हा” व्हिडिओ ठरणार महत्त्वाचा पुरावा!
- Raj Thackeray : सभा रद्द होण्याच्या नुसत्या बातम्या; पण सभा होणारच!!; उद्या देणार तारीख!!