• Download App
    आधीच कडक उन्हाळा त्यात सभा, रॅलींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण टिपेला अन् झळा मात्र जनतेला! The already hot summer will heat up the political atmosphere in Maharashtra due to meetings and rallies

    आधीच कडक उन्हाळा त्यात सभा, रॅलींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण टिपेला अन् झळा मात्र जनतेला!

    जनतेला उन्हाळ्यासोबतच राजकीय झळाही सोसाव्या लागणार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र शासनाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा नुकताच नवी मुंबईत खारघर येथे प्रचंड जनसमूदायाच्या साक्षीने आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पार पडला. पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. मात्र या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या श्री सदस्यांपैकी ११ जणांचा रणरणत्या उन्हात बसून राहिल्याने उष्माघाताने मृत्यू झाला. या घटनेमुळे या सोहळ्यास गालबोट लागल्याचं बोललं जात आहे. मात्र उन्हाळ्याचे पुढील दोन महिने ही महाराष्ट्रासाठी वातारणाच्यादृष्टीनेही आण् राजकीयदृष्ट्याही गरमच असणार आहे. The already hot summer will heat up the political atmosphere in Maharashtra due to meetings and rallies

    राज्यभरात आगामी दोन महिन्यात विविध राजकीय पक्षांच्या अनेक सभा, रॅली आणि कार्यक्रम असणार आहेत. साहाजिकच हे कार्यक्रम दिवसा होणार असल्याने, कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य जनतेला उन्हाळ्यासोबतच राजकीय झळाही सहन कराव्या लागतील. उन्हाळ्यात विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सियसच्याही वर असा प्रचंड वाढलेला असतो, या भागांमध्ये आगामी काळात अनेक राजकीय कार्यक्रमांचे नियोजन असल्याची माहिती समोर आली आहे.

    महाराष्ट्र भूषण सोहळ्यास उपस्थित नागरिकांबाबत घडलेल्या दुर्घटनेवरून राजकीय पक्षांनी आतातरी काही बोध घ्यायला हवा, असं राजकीय जाणकारांचं मत आहे. राजकीय कार्यक्रमांच्या ठिकाणी केवळ नेते मंडळींचीच नाही तर येणाऱ्या नागरिकांसाठी देखील पुरेसे पाणी, सावली, आपत्कलीन सुविधांची सोय केलेली असावी. तर उन्हाळ्यात राजकीय सभा, रॅली किंवा अन्य कार्यक्रम दिवसा भर दुपारी घेऊच नयेत, दोन महिने हे कार्यक्रम स्थगित करावेत असेही काहींनी मत व्यक्त केले आहे.

    राज्यात सध्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा सुरू आहेत. आगामी काळात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी या सभा होणार आहेत. याशिवाय सत्ताधारी भाजपा-शिवसेना(शिंदे गट) यांचेही कार्यक्रम असणार आहेत. मनसे नेते राज ठाकरे यांचीही कोकण सभा आहे. अशावेळी उन्हाचा कडाका पाहता आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या प्रकाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी योग्य ती दक्षता घेणे आवश्यक आहे.

    The already hot summer will heat up the political atmosphere in Maharashtra due to meetings and rallies

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ