विशेष प्रतिनिधी
पुुणे :भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तीन पक्षांनी आघाडी केल्यामुळे त्या पक्षांचा अवकाश कमी होऊन श्वास कोंडला गेला आहे. दुसरीकडे भाजपाला संपूर्ण राज्यभर मोकळ्या श्वासाने काम करून पक्ष विस्ताराची संधी मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी स्वबळावर सत्तेवर येईल, असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला.The alliance took the breath away of all three parties, giving the BJP a chance to expand
शिवसेनेच्या नेत्या व पुणे जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे आपल्याला मोकळा श्वास घेतल्यासारखे वाटते, असे बुचके यांनी प्रवेश केल्यानंतर सांगितले होते. त्याचा धागा पकडून फडणवीस यांनी टिप्पणी केली.
फडणवीस म्हणाले की, राज्यात तीन पक्षांचे आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपाला पक्षविस्ताराची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. युतीमध्ये असताना भाजपाला पक्षविस्ताराला संधी मिळत नव्हती. आता तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यातील घटक पक्षांचा श्वास कोंडू लागला आहे. आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात मोकळ्या श्वासाने पक्षाचे काम करू आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर भाजपाला सत्तेवर आणू.
आशाताईंसारख्या कार्यकर्त्या सत्तारूढ पक्षातून भाजपामध्ये येतात ही स्वबळावरील विजयाची नांदी आहे. बुचके यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. त्यांचा भाजपामध्ये सन्मान केला जाईल. भाजपामध्ये आतला – बाहेरचा, जुना – नवा असा भेद नाही. एकदा पक्षाचा झेंडा हाती घेतला की पक्ष त्या नेत्याची काळजी करतो.
The alliance took the breath away of all three parties, giving the BJP a chance to expand
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : ठाकरे सरकार अनिल देशमुखांना ईडीच्या ताब्यात देण्याऐवजी लपवण्यात मश्गुल, किरीट सोमय्यांचा आरोप
- Bengal Post Poll Violence : ममतांच्या छत्रछायेखाली झालेल्या हिंसाचाराचा तपास सीबीआय करणार
- पुण्यातील नरेंद्र मोदी मंदिरातून पुतळा हटवला, थेट पंतप्रधानांच्या कार्यालयातून आला होता फोन
- शब्दबंदी : दोन राज्ये दोन निर्णय…!! एक राजकीय, दुसरा धर्मभावनेतून…!!
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधूच्या कोचला अयोध्येला येण्याचे निमंत्रण का दिले…?? वाचा…