मराठा आरक्षणास पाठींबा देत आक्रोश पदयात्रा स्थगित केली होती.
विशेष प्रतिनिधी
सांगली : मराठा आरक्षणास पाठींबा देत स्थगित करण्यात आलेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रेश पदयात्रा आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. साखराळे येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्यापासून ही यात्रा आज सकाळी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. The Akrosh Padayatra of Swabhimani Shetkari Sanghatana has started again from today
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील हंगामातील ४०० रुपये मिळावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कर्नाटकातील सदलगा येथे उसाच्या फडात जाऊन ऊसतोड बंद पाडत, रोष व्यक्त केला आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ४०० रूपयाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार व शेतकरी संघटना प्रतिनिधींची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.मात्र यामध्येही मार्ग निघाला नसल्याने आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदाराविरुद्ध आक्रमक धोरण स्वीकारले आहे.
या अगोदर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या उपोषणास पाठींबा म्हणून राजू शेट्टी यांनी २२ दिवसाची ५२२ किलोमीटरची आक्रोश यात्रा १३ व्या दिवशी स्थगित केली होती.
The Akrosh Padayatra of Swabhimani Shetkari Sanghatana has started again from today
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation : ”सरकार म्हणून कुठलाही निर्णय घाई गडबडीत घेऊ शकत नाही”, मुख्यमंत्री शिंदेंची स्पष्ट भूमिका!
- world cup 2023 : लंकेचे पुरते पत्ते पिसले, 55 धावांत डाव कोसळला; टीम भारत सेमी फायनल मध्ये!!
- अंगणवाडी सेविकांनंतर आता एसटी कर्मचाऱ्यांनाही खुशखबर; दिवाळीत एसटी महामंडळाला 378 कोटींची मदत!!
- मनोज जरांगेंचे उपोषण सुटले; मराठा आरक्षणासाठी सरकारला 2 जानेवारी 2024 पर्यंत दिला वेळ!!