विशेष प्रतिनिधी
पुणे : कल्याणी नगर पोर्शे कार अपघात प्रकरणातल्या अग्रवाल कुटुंबाचे अंडरवर्ल्ड मधील गुंडांशी संबंध आहेत, 2007 – 08 मधले म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळातले, पण आता ते सगळे प्रकरण निस्तरावे लागत आहे भाजपच्या नेत्यांना!! अशी स्थिती पुण्यातली दिसते आहे. The Agarwal family’s links with the underworld date back to the Congress-NCP regime
पोर्शे कार अपघातातील गुन्हेगार वेदांत अग्रवाल त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि त्याचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल हे सगळे कुठे ना कुठे अंडरवर्ल्ड मधल्या गुंडांशी संबंधित आहेत. आपला नातू वेदांता इथून पुढे अभ्यासात लक्ष घालेल तो वाईट संकेत राहणार नाही अशी हमी त्याचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी दिली याच सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी शिवसेनेचे नेते अजय चव्हाण यांच्यावर छोटा राजनचे गुंड घातले होते. सुरेंद्रकुमार अग्रवाल यांचे छोटा राजनशी संबंध होते.
अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे राजकीय क्षेत्रात येण्यापूर्वी विशाल अग्रवाल यांच्या ब्रह्मा कॉर्प या कंपनीतच नोकरीला होते. सुनील टिंगरे यांच्या भोवती दाट संशयाचे वातावरण निर्माण झाले कारण ते पहाटे 3.00 वाजता आरोपीला वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेल्याचे बोलले गेले. या संदर्भात काही कबुली त्यांनी दिली. त्याचवेळी आपण विशाल अग्रवाल यांच्याकडे नोकरी केल्याचेही ते म्हणाले.
अजित पवारांनी देखील या अपघातानंतर 3 दिवसांनी या प्रकरणात लक्ष घातले. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूणच भूमिकेविषयी दाट संशय निर्माण झाला.
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पुण्याचे पोलीस आयुक्तालय गाठून तिथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आज सकाळी कोरेगाव पार्क मधल्या बेकायदा पब वर बुलडोझर फिरले. ज्या पब मध्ये वेदांत अग्रवाल दारू प्यायला त्या पबला पोलिसांनी सील ठोकले आहे. पोलिसांनी कठोर कारवाई करत विशाल अग्रवाल यांच्यासह 7 जणांना अटक करून त्यांना पोलीस कोठडीत ठेवले आहे. पुणे सत्र न्यायालयाने देखील या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांवर आणि गुंड – बिल्डर या संबंधांवर कडक शब्दांमध्ये ताशेरे ओढले.
कल्याणी नगर परिसरातले गुंड आणि बिल्डर दोन्हीही कुठे ना कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहेत. पण राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपचे प्रमुख नेते आणि राज्याचे गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांना हे सगळे प्रकरण निस्तरावे लागत आहे.
The Agarwal family’s links with the underworld date back to the Congress-NCP regime
महत्वाच्या बातम्या
- अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, 4 आयसिस दहशतवादी पकडले, सर्व श्रीलंकेचे रहिवासी
- पीएम मोदी म्हणाले, भाजप अल्पसंख्याक विरोधात नाही; पण विशेष नागरिक कुणालाही मानणार नाही
- रईसींच्या निधनानंतर इराणमध्ये सत्तासंघर्षाचा धोका; धर्मगुरू अन् लष्करात वर्चस्ववाद उफाळण्याची शक्यता
- सगळी मिथके तोडून भाजप दक्षिणेतला सगळ्यात मोठा पक्ष ठरेल; पंतप्रधान मोदींना विश्वास!!