• Download App
    पोर्शे कार अपघातातील आरोपीवर अल्पवयीन नव्हे, तर प्रौढ आरोपीचाच खटला चालणार; पोलीस आयुक्तांची ग्वाही!!|The accused in the Porsche car accident will be tried not as a minor, but as an adult; Testimony of Police Commissioner!!

    पोर्शे कार अपघातातील आरोपीवर अल्पवयीन नव्हे, तर प्रौढ आरोपीचाच खटला चालणार; पोलीस आयुक्तांची ग्वाही!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पोर्शे कार अपघातातील आरोपी वेदांत अग्रवाल (वय 17) हा अल्पवयीन असला आणि त्याला न्यायालयाने 15 तासांमध्ये जामीनावर सोडले असले, तरी प्रत्यक्षात या आरोपीवर अल्पवयीन म्हणून नाही, तर प्रौढ आरोपी म्हणूनच खटला चालवावा, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाला केल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.The accused in the Porsche car accident will be tried not as a minor, but as an adult; Testimony of Police Commissioner!!

    अपघातातील दोन मृतांच्या नातेवाईकांना काही लोकांनी धमक्या दिल्याची तक्रारी पोलिसांच्या कानावर आले आहेत. परंतु, प्रत्यक्षात त्या नातेवाईकांनी किंवा मित्रांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली नाही, तरी देखील धमक्या प्रकरणात पोलिसांनी लक्ष घातले असून धमक्या देणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अमितेश कुमार यांनी दिला.



    राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर या सगळ्या प्रकरणात राजकीय क्षेत्रातून प्रचंड भडीमार झाला. ते आरोपी वेदांत अग्रवाल याला वाचवत असल्याचा आरोप झाला. त्यानंतर सुनील टिंगरे यांनी पुढे येऊन खुलासा केला आणि आपला या प्रकरणात कुठलाही संबंध नसल्याचा कानावर हात ठेवला.

    पोर्शे कार हिट अँड रन केसमधला आरोपी कितीही मोठा असला, तरी या अपघात प्रकरणात अडकलेल्या कोणालाही सोडू नका, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिले. त्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर पुणे पोलिसांनी 24 तासांमध्ये आरोपी वेदांत अग्रवालचे वडील ब्रह्मा कॉर्पचे मालक विशाल अग्रवाल, त्यांचा ड्रायव्हर याच्यासह 7 जणांना अटक केली. अपघातानंतर विशाल अग्रवाल फरारी झाले होते. त्यांना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर म्हणून अटक केली. अटक केलेल्यांमध्ये पब मालकासह पब व्यवस्थापक आणि काउंटर व्यवस्थापक याचाही समावेश आहे.

    The accused in the Porsche car accident will be tried not as a minor, but as an adult; Testimony of Police Commissioner!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!