• Download App
    Devendra Fadnavis म्हणून सुधीर मुनगंटीवार यांना मिळाले नाही

    Devendra Fadnavis : म्हणून सुधीर मुनगंटीवार यांना मिळाले नाही मंत्री पद, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कारण

    Devendra Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : Devendra Fadnavis  भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना यंदाच्या नव्या मंत्रिमंडळात घेण्यात आलेले नाही. त्यांची समजूत काढली जात असून पक्षातील इतर जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.Devendra Fadnavis

    देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझी सुधीर मुनंगटीवार यांच्याशी नीट चर्चा झाली आहे. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्यामागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस केला आहे. शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी चालवायच्या असतात. त्यामुळे काहीवेळा सरकारमध्ये काम करणारे पक्षात तर पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात. सुधीर मुनगंटीवार अतिशय अनुभवी नेते आहेत. आमच्या केंद्रीय पक्षाने त्यांच्याबद्दल काहीतरी विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतले नाही”, असे देवेंद्र फडणीस म्हणाले.



    सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मी नाराज नाही, पक्षाने जो आदेश दिला, जबाबदारी दिली त्याचं मी पालन केलं आहे. मला याची जाणीव आहे की मी विधानसभेत आलो असतो तर अनेक जण अनेक प्रश्न विचारतील. त्या प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा मौनं, सर्वार्थ साधनं हे मी मानतो तसंच श्रद्धा आणि सबुरी ठेवली पाहिजे.

    सभागृहाचं आज काहीही काम नाही. मी मंत्री असतो तर सही करावी लागते. तारांकित प्रश्न मांडले जातात. आत्ता काम काही नाही. तारांकीत प्रश्न नाहीत त्यामुळे मी आलो नाही. या अधिवेशनात औचित्याचे मुद्दे उपस्थित करेन. जनतेचे प्रश्न मांडावेच लागतील. मला मंत्रिमंडळात ज्यांनी घेतलं नाही तेच उत्तर देऊ शकतील की मला मंत्री का केलं नाही. मला काही सांगता येणार नाही. मला मंत्रिमंडळात घेतलं जाणार नाही अशी जाणीव मला कुणी करुन दिली नाही. मी संघटनेवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मला प्रमोद महाजन यांचं वाक्य आठवतं आहे पावला-पावलावर मनाविरुद्ध घडत असताना जो काम पुढे नेतो तोच खरा कार्यकर्ता. हे वाक्य मी माझ्या मनात जपून ठेवलं आहे. असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. माझं देवेंद्र फडणवीस यांच्याशी आणि चंद्रशेखर बावनकुळेंशी बोलणं व्हायचं पण मी मंत्रिमंडळात नाही हे काही मला जाणवलं नाही. माझं नाव मंत्रिमंडळात आहे हे सांगण्यात आलं होतं असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. मला दोन्ही नेत्यांनी म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनीही नाव आहे हेच सांगितलं होतं”, असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.

    That’s why Sudhir Mungantiwar didn’t get a ministerial post, said Devendra Fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस