विशेष प्रतिनिधी
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामागे माजी वनमंत्री संजय राठोडचा हात असल्याचा आरोप होत असून पूजा चव्हाण हिच्याशी राठोडने संवाद साधला होता. तो आवाज राठोडचा असल्याचा पुनरुच्चार भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. That voice of Sanjay Rathod: Chitra Wagh
काही महिन्यांपूर्वी पूजा चव्हाणने आत्महत्या केली होती. या प्रकरणी माजी वनमंत्री संजय राठोड जबाबदार असल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर राठोडने पदाचा राजीनामा दिला होता.
प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासात पोलिसांना पूजाने एका पुरुषाबरोबर केलेल्या मोबाईलवरील संभाषण सापडले आहे. त्यातील आवाज हा आता राठोडचा असल्याचे पोलीस सांगत आहेत. परंतु, अगोदरपासून तो आवाज राठोचाच असल्याचे आम्ही सांगत होतो, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
- तो आवाज संजय राठोडचा : चित्रा वाघ
- काही महिन्यांपूर्वी पूजा चव्हाणने आत्महत्या केली
- आत्महत्येस राठोड जबाबदार असल्याचा आरोप
- पूजा चव्हाण – राठोड संवाद उघड झाल्याचा दावा