• Download App
    Ajit Pawar अजितदादांची पायाभरणी आणि नंतरची सहानुभूती यामुळे पुणे जिल्ह्यात चालली राष्ट्रवादीची हवा, भाजपनेही दिला होता "बाय"!!

    अजितदादांची पायाभरणी आणि नंतरची सहानुभूती यामुळे पुणे जिल्ह्यात चालली राष्ट्रवादीची हवा, भाजपनेही दिला होता “बाय”!!

    नाशिक : जिल्हा परिषद निवडणुकीत पुणे जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा आली. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जाहीर निकालांपैकी 43 जागा जिंकल्या. त्यांनी बहुमताचा आकडा आधीच पार केला. अजितदादांनी केलेली पायाभरणी आणि त्यांच्या अकाली एक्झिट नंतर निर्माण झालेली सहानुभूती याचा फायदा राष्ट्रवादीला झाला आणि त्या पक्षाची हवा पुणे जिल्ह्यात चालली. पण या निकालाला भाजपने “बाय” दिल्याचीही किनार राहिली. Ajit Pawar

    – महापालिकांमध्ये अजितदादांना बसला होता फटका

    जिल्हा परिषद निवडणुकांच्या आधी महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि अजितदादा यांच्यात जोरदार टक्कर झाली होती. महायुतीत सत्तेत असले तरी भाजपने अजितदादांना पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांची निवडणूक स्वतंत्रपणे लढायला लावली होती. त्यावेळी आपण एकमेकांवर टीका करायची नाही फक्त स्वतंत्रपणे निवडणूक लढवायचे असे दोन्ही बाजूंनी ठरविले होते, पण अजितदादांनी ती अट पाळली नव्हती. अजितदादांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये भाजपवरच भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि तिथेच ते फसले होते. भाजपच्या स्थानिक शिलेदारांनी अजितदादांसारख्या दिग्गजाला आस्मान दाखविले. पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांतदादा पाटलांपुढे अजितदादांचे नेतृत्व फिके पडले होते, तर पिंपरी चिंचवड मध्ये एकट्या महेश लांडगे यांनीच अजित दादांना आस्मान दाखविले होते. भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ होते त्यामुळे अजित दादांची आक्रमक मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये चालू शकली नव्हती.

    – जिल्हा परिषदेत भाजपने राखला संयम

    जिल्हा पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत देखील भाजपा आणि अजितदादांची स्वतंत्रपणेच लढले. पण दोन्ही बाजूंनी प्रचारात तरी संयम ठेवला होता.‌ अजितदादा हयात असताना त्यांनी संयमाने प्रचार सुरू केला होता. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत आक्रमकपणा आपल्याला नडला, हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी शांतपणे राष्ट्रवादीचे बांधणी करून प्रचार चालविला. जिल्हा परिषद निवडणूक ऐन मध्यावर आली असतानाच अजितदादांची अकाली एक्झिट झाली. त्यानंतर भाजपने शांतपणे प्रचार करायचा निर्णय घेतला भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या सभा सुद्धा रद्द केल्या. त्याचवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सुद्धा शांतपणे प्रचार केला. या सगळ्यांमुळे अजित पवारांच्या अकाली एक्झिटची एक सहानुभूती तयार झाली. तिचा परिणाम पुणे जिल्ह्यात झाला. बारामती सारख्या बालेकिल्ल्यात मतदानाची टक्केवारी घटली असली, तरी अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या विजयात त्याचा फरक पडला नाही. पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातल्या मतदारांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बहुमताने निवडून आणले.

    – सहानुभूतीचा मर्यादित फायदा पुणे जिल्ह्यातच

    अजितदादा हयात असताना भाजपने ज्याप्रकारे आक्रमकपणे निवडणूक लढवायचा निर्णय घेतला होता तो निर्णय भाजपने नंतर बदलला आपली प्रचाराची रणनीती थोडी बाजूला ठेवली. अजित पवारांच्या विषयीची सहानुभूती राष्ट्रवादीच्या दिशेने वळेल हे लक्षात आल्यानंतर त्याला अनावश्यक अटकाव करण्याच्या फंदात भाजपचे नेते पडले नाहीत. भाजपच्या नेत्यांनी पुणे जिल्हा वगळून इतर जिल्ह्यांमध्ये संयमाने पण निश्चयाने प्रचार केला. त्यामुळे अजित पवारांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती पुणे जिल्हा पुरती मर्यादित राहिली ती सातारा कोल्हापूर किंवा सांगली या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांमध्ये फारशी पोहोचली नाही किंवा पोहोचली तरी तिचा राजकीय लाभ भाजप शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना एकत्रित रितीने झाला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात महायुतीची सत्ता आली. भाजप एक नंबरचा पक्ष ठरला तर शिंदे सेना आणि अजितदादा राष्ट्रवादी यांच्यात दोन नंबर साठी स्पर्धा झाली. पण ती स्पर्धा सुद्धा उगाच आक्रस्ताळी झाली नाही.

    – शरद पवारांची राष्ट्रवादी सहाव्या क्रमांकावर

    या सगळ्यात अजित पवारांच्या विषयीच्या सहानुभूतीचा फायदा त्यांच्या पक्षाला झाला असला तरी तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीला झाल्याचे दिसले नाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या बहुतेक उमेदवारांनी घड्याळा चिन्हावरच निवडणूक लढवणे पसंत केले ते त्यांना फायद्याचे ठरले पण ज्यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवली त्यांना मात्र अजितदादांच्या विषयीच्या सहानुभूतीचा फायदा मिळू शकला नाही म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आकडेवारी सहाव्या क्रमांकावरची राहिली.

    Thanks to Ajit Pawar groundwork and the subsequent sympathy wave

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ZP elections results : भाजपच नंबर 1; अजितदादांच्या राष्ट्रवादीला सहानुभूतीचा फायदा; 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता!!

    ग्रामीण महाराष्ट्र शरद पवारांना “मानतो”, हे मिथक जिल्हा परिषद निकालांनी उद्ध्वस्त; अजितदादांच्या ब्रँडची देखील मर्यादा स्पष्ट!!

    प्रफुल्ल पटेल, तटकरेंना चिल्ले पिल्ले म्हणून हिणवणाऱ्या उत्तम जानकारांच्या मुलाचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव, तो देखील राम सातपुतेंच्या पत्नीकडून!!