या तीन मुलींमध्ये शंकर महाजन यांच्या मुलीसह त्यांच्याकडे पाहुण्या आलेल्या दोन भाच्यांचाही समावेश आहे.Thane: Three girls were injured when the plaster of a house slab collapsed
विशेष प्रतिनिधी
ठाणे : ठाण्यातील लोकमान्यनगर पाडा नंबर दोन येथील गणेश कृपा सोसायटी नंबर दोन मधील चौथ्या मजल्यावरील घरातील (सिलिंग) स्लॅबच्या प्लास्टरचा काही भाग कोसळला.
यामध्ये शंकर महाजन यांच्या तीन लहान मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत.या तीन मुलींमध्ये शंकर महाजन यांच्या मुलीसह त्यांच्याकडे पाहुण्या आलेल्या दोन भाच्यांचाही समावेश आहे.ही घटना शुक्रवारी रात्री घडली.
या दुर्दैवी घटनेत मानसी जाधव (१०) हिच्या उजव्या पायाला तर आस्था गोडसे (१०) हिच्या पाठीवर आणि तनिष्का महाजन (९) हिच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.या घटनेची माहिती कळताच,
ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि पोलिसांनी धाव घेतली. स्लॅबच्या प्लास्टरचा काही भाग खाली पडला आणि तडा गेला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
Thane: Three girls were injured when the plaster of a house slab collapsed
महत्त्वाच्या बातम्या
- माझ्यावर टीका करण्याआधी मुस्लिम पुरुषांनी आपला दृष्टीकोन बदलावा, उर्फी जावेदने दिले टीकाकारांना उत्तर
- पंतप्रधानांची अन्नदात्याला नववर्षाची भेट, शेतकऱ्यांच्या खात्यावर एक जानेवारीला जमा होणार २० हजार कोटी रुपये
- कट्टर इस्लामवाद्यांचा विरोध, केवळ महिलांसाठीच्या बीचची कल्पना काही तासांतच रद्द
- HAPPY NEW YEAR 2022 : जगभरात गुंजणार शंखनाद!नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काशी विश्वनाथ धाममधून 1001 जणांचा एकत्र शंखनाद