• Download App
    नांदेडच्या सरकारी रुग्णालयात ठाण्याची पुनरावृत्ती, अवघ्या 24 तासांत 24 जणांचा मृत्यू|Thane repeats at Nanded's government hospital, 24 dead in just 24 hours

    नांदेडच्या सरकारी रुग्णालयात ठाण्याची पुनरावृत्ती, अवघ्या 24 तासांत 24 जणांचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी

    नांदेड : नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 24 तासांमध्ये 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृतांमध्ये 12 नवजात (6 मुले, 6 मुली) अर्भके, सात महिला व 5 पुरुषांचा समावेश आहे. 30 सप्टेंबर रात्री 12 ते 1 ऑक्टोबर रात्री 12 वाजेदरम्यान या सर्वांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. यात चौघांना हृदयविकाराचा झटका, एक विषबाधा, एक जठरव्याधी, 2 किडनी व्याधी, एक प्रसूती गुंतागुंत व 3 अपघातातील रुग्णांचा समावेश आहे. 4 बालकांना अत्यवस्थ स्थितीत खासगी रुग्णालयातून रेफर झाले होते. दरम्यान, अजून 70 रुग्ण गंभीर अवस्थेत असून राज्य सरकारने युद्धपातळीवर निर्णय घेऊन त्या रुग्णांचे प्राण वाचवावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.Thane repeats at Nanded’s government hospital, 24 dead in just 24 hours



    ठाण्यातील कळवा येथील मनपाच्या रुग्णालयात दोन महिन्यांपूर्वी 24 तासांत 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याच्या चौकशीचा अहवाल येऊन दोषींवर कारवाई होण्यापूर्वीच नांदेडमध्ये त्यापेक्षा जास्त प्रमाणात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. नांदेडच्या सरकारी रुग्णालयात गत 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 12 जणांचा मृत्यू सर्पदंश व विषबाधेमुळे झाल्याची माहिती आहे. औषधी व मनुष्यबळाचा तुटवडा ही या मृत्यूमागील प्रमुख कारणे असल्याचा दावा केला जात आहे.

    या रुग्णालयात नांदेड जिल्ह्यासह लगतच्या परभणी, हिंगोली, यवतमाळ व तेलंगणा भागातील शेकडो रुग्ण येतात. त्यातच ही घटना घडल्यामुळे या भागात मोठी खळबळ माजली आहे.

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुग्णालयात दोन महिन्यांपासून विविध औषधांचा तुटवडा जाणवत आहे. प्रसूतीसाठी आवश्यक कॉटन बंडल उपलब्ध नाही.

    दरम्यान, ठाण्यातील कळवा रुग्णालयात 36 तासांत 22 जणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. त्याचे राजकीय पटलावर तीव्र पडसाद उमटले होते. विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकामासाठी बंद करण्यात आल्यामुळे तेथील रुग्णांचा अतिरिक्त ताण कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावर पडला होता. त्यातून ही घटना घडल्याचा दावा प्रशासनाने केला होता. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठली होती.

    Thane repeats at Nanded’s government hospital, 24 dead in just 24 hours

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल