• Download App
    NCB चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे पुन्हा अडचणीत, ठाणे पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल, वानखेडेंची उच्च न्यायालयात धाव । Thane Police registers fraud FIR against former zonal director of NCB, Sameer Wankhede knocks on High Court's door

    NCB चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे पुन्हा अडचणीत, ठाणे पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल, वानखेडेंची उच्च न्यायालयात धाव

    ठाणे पोलिसांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हॉटेल आणि बारचा परवाना मिळवताना फसवणूक केल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर आहे. खोटी माहिती देऊन आणि फसवणूक करून हा परवाना घेतल्याचा ठपका ठेवत नवी मुंबईतील हॉटेल आणि बारचा परवाना जिल्हा दंडाधिकारी राजेश नार्वेकर यांनी रद्द केला. राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर कोपरी पोलीस ठाण्यात वानखेडेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. विजयकुमार राठोड यांनी सांगितले. Thane Police registers fraud FIR against former zonal director of NCB, Sameer Wankhede knocks on High Court’s door


    वृत्तसंस्था

    ठाणे : ठाणे पोलिसांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हॉटेल आणि बारचा परवाना मिळवताना फसवणूक केल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर आहे. खोटी माहिती देऊन आणि फसवणूक करून हा परवाना घेतल्याचा ठपका ठेवत नवी मुंबईतील हॉटेल आणि बारचा परवाना जिल्हा दंडाधिकारी राजेश नार्वेकर यांनी रद्द केला. राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर कोपरी पोलीस ठाण्यात वानखेडेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. विजयकुमार राठोड यांनी सांगितले.

    कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी गतवर्षी नोव्हेंबरमध्ये समीर वानखेडेंवर आरोप केले होते. ते म्हणाले होते की, वानखेडे यांचा वाशी, नवी मुंबई येथे परमिट रूम आणि बार असून, त्याचा परवाना 1997 मध्ये समीर वानखेडे यांच्या नावाने घेतला होता. तेव्हा वानखेडे अल्पवयीन होते, त्यामुळे तो बेकायदेशीर आहे.

    सरकारी नोकरी असूनही बार लायसन्स

    सरकारी सेवेत असूनही वानखेडे यांच्याकडे परमिट रूम चालवण्याचा परवाना आहे, जो सेवा नियमांच्या विरोधात आहे, असेही मलिक म्हणाले होते. त्यानंतर वानखेडे यांनी मंत्र्यांचे दावे फेटाळून लावले होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाने नंतर वानखेडे यांना बारच्या परवान्याबाबत नोटीस बजावली होती. याआधी एका अधिकाऱ्याने सांगितले होते की, वानखेडे यांनी नोटीसला दिलेल्या उत्तरानंतर आणि या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर जिल्हाधिकारी या निष्कर्षाप्रत आले की, वानखेडे यांनी 1997 मध्ये बार परवाना घेतला होता. तेव्हा ते मान्यताप्राप्त वय 21 ऐवजी 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते.

    समीर वानखेडे यांची उच्च न्यायालयात याचिका

    ठाणे पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यासोबतच ठाणे जिल्हाधिकार्‍यांनी रद्द केलेला बारचा परवाना पूर्ववत करावा यासाठी वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान, ठाणे पोलिसांनी वानखेडे यांनाही समन्स बजावले आहे. त्याला संबंधित कागदपत्रांसह जबाब नोंदवण्यासाठी २३ फेब्रुवारीला पोलीस ठाण्यात यावे लागणार आहे.

    Thane Police registers fraud FIR against former zonal director of NCB, Sameer Wankhede knocks on High Court’s door

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस