विशेष प्रतिनिधी
ठाणे – शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना निवासासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध व्हावे यासाठी ठाण्यात उभारण्यात आलेले डॉ. पंजाबराव देशमुख मराठा विद्यार्थी वसतिगृहाचे लोकार्पण नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. Thane corporation opened hostel for Maratha students
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणारी ठाणे ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. या वसतिगृहात ५० विद्यार्थ्यांची सोय असून यामध्ये स्वयंपाकघर व भोजन कक्षाची सुविधा अंतर्भूत आहे. प्रत्येक खोलीमध्ये बैठक खोली, स्नानगृह, शौचालय असून त्यामध्ये पलंग, कपाट, अभ्यासासाठी टेबल व खुर्ची, गरम पाण्याची सोय आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पोखरण रोड नंबर २ येथे ठाणे महापालिकेने उभारलेल्या या वसतिगृहात मराठा मुला-मुलींना प्रवेश देण्याबाबतची संपूर्ण जबाबदारी ही शासनाची असेल. इमारतीच्या पुढील बाजूस १५०० चौ. फूट जागा विद्यार्थ्यांकरिता खेळण्यासाठी व पार्किंगसाठी ठेवण्यात आली आहे.
ठाणे महापालिका विद्यार्थ्यांच्या पाठीशी पूर्णपणे असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले. भाईंदरपाडा येथेही वसतिगृहाचे काम सुरू असून त्या ठिकाणी १०० विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होणार असल्याचे नमूद केले.
Thane corporation opened hostel for Maratha students
महत्त्वाच्या बातम्या
- पाच हजार दहशतवाद्यांची काबूलच्या तुरुंगातून सुटका; तालिबानचे अफगाणिस्तावर वर्चस्व
- बिहारमध्ये गंगेचे रौद्र रूप धारण केल्याने हाहाकार, महापुराचा तीन लाख लोकांना फटका
- तालिबानच्या घुसखोरीनंतर अमेरिकन अधिकाऱ्यांची हेलिकॉप्टरने सुटका, भारतीयांनाही सुखरुप सोडवले
- डेक्कन क्वीनच्या शिरपेचात विस्टाडोममुळे मानाचा आणखी एक तुरा, निसर्गरम्य सौंदर्य अनुभवल्याने प्रवासी सुखावले