प्रतिनिधी
मुंबई : भारतावर सायबर हल्ले करण्याची धमकी देत मलेशियातील हॅकर्सनी ठाणे शहर पोलिसांची वेबसाईट हॅक केली आहे. प्रेषित मोहम्मदाचा अपमान केल्याबद्दल भारताने संपूर्ण जगातल्या मुस्लिमांची माफी मागावी, अशी धमकीच हॅकर्सनी दिली आहे. Thane city police website hacked; Muslims apologize, hackers threaten Malaysia
मलेशियातील हॅकर्सनी ठाणे शहर पोलिसांची वेबसाईट हॅक केली आहे. “वन हॅक सायबर टीम”ने वेबसाइट हॅक केल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतीयांनी इस्लामचा अपमान केला आहे त्यामुळे पोलिसांची वेबसाईट हॅक केल्याचा संदेशही हॅकर्सनी दिला आहे. सोबत एक गाणही अपलोड करण्यात आले आहे.
सकाळपासूनच ठाणे शहर पोलिसांची वेबसाईट हॅक झाली आहे. एका इस्लामिक संघटनेने ही वेबसाईट हॅक केल्याचे त्या वेबसाईटवर म्हटले आहे. वन हॅक सायबर टीम आपल्यासाठी काम करत असल्याचेही यात म्हटले आहे.
जगभरातील मुस्लिमांची माफी मागा
मागच्या काही दिवसांपासून नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर, मुस्लिम समाज, संघटना नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलिसांची वेबसाईट हॅक केल्याचे सांगण्यात येत आहे. भारतात मुस्लिम धर्मीयांच्या बाबतीत अडचणी निर्माण केल्या जात आहेत. त्यामुळे ही वेबसाईट हॅक करत आम्ही एक संदेश देत आहोत की, जर तुम्ही संपूर्ण जगभरातील मुस्मिमांची माफी मागितली नाही, तर मात्र आम्ही शांत राहणार नाही, असा एक धमकी या हॅकर्सनी दिली आहे. यामध्ये एक गाणेही अपलोड करण्यात आले आहे. या गाण्यातही माफी मागण्याचा संदेश देण्यात आला आहे.