विशेष म्हणजे या वृद्धांपैकी ५० ते ५२ जणांचं लसीकरण पूर्ण झालंय. तर, काहींचा दुसरा डोस बाकी होता.Thane: 54 old people in old age home infected with corona; Old age home seal
विशेष प्रतिनिधी
ठाणे : जगात ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटची दहशत पसरली आहे.यातच आता ठाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.वृद्धाश्रमातील ५४ वृद्धांना कोरोनाची लागण आहे.
भिवंडीजवळील खडवली गावात मातोश्री वृद्धाश्रम आहे.या वृद्धाश्रमातील ५४ वृद्धांना कोरोनाची लागण झाली असून वृद्धांसोबत ५ केअर टेकर्सला देखील कोरोणाची लागण झाली आहे.यातील काहींची प्रकृती स्थिर नसल्याने त्यांना ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
तसेच वृद्धांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.विशेष म्हणजे या वृद्धांपैकी ५० ते ५२ जणांचं लसीकरण पूर्ण झालंय. तर, काहीचा दुसरा डोस बाकी होता. काही दिवसांपूर्वी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ हयातीचा दाखला देण्यासाठी कल्याणला गेले होते. त्या ठिकाणी लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.सध्या हा वृद्धाश्रम सील करण्यात आला असून सॅनिटायझेशचं काम सुरू आहे.