नाशिक : 2026 चा जानेवारी महिना महाराष्ट्रातल्या राजकारणात खरी “क्रांती” घेऊन आला. कारण याच महिन्यात मुंबईतल्या राजकारणातून ठाकरे “नॉन प्लस” झाले, तर उर्वरित महाराष्ट्रातून पवार नॉन प्लस झाले. महाराष्ट्रातल्या राजकारणाचा केंद्रबिंदू पूर्णपणे भाजप झाला. महाराष्ट्रातल्या साठ वर्षांच्या राजकारणात खऱ्या अर्थाने वळण आले!! कुठल्याही ज्योतिषाने किंवा भविष्यवेत्याने महाराष्ट्राच्या राजकारणात अशी “क्रांती” होईल, असे सांगितले नव्हते.
– मुंबईतून ठाकरे “नॉन प्लस”
मुंबई महापालिकांच्या निवडणुकांनंतर तिथून ठाकरे “नॉन प्लस” झाले कारण मुंबईतल्या जनतेने ठाकरे बंधूंना नाकारले. इथून पुढचे मुंबई महापालिकेतले निर्णय मातोश्री वरून होणार नाहीत, तर ते “वर्षा” बंगल्यावरून होतील. अर्थातच वर्षावर भाजपचे मुख्यमंत्री बसले असल्याने तेच मुंबई महापालिकेतल्या प्रत्येक निर्णयाचा निर्णायक भाग असतील.
– उर्वरित महाराष्ट्रातून पवार “नॉन प्लस”
पण त्या पलीकडे जाऊन अजितदादांच्या एक्झिट मुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खरी “क्रांती” घडली. महाराष्ट्रातल्या निर्णय प्रक्रियेतून शरद पवार “नॉन प्लस” झाले. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याच्या निर्णयात अशा काही राजकीय खेळी झाल्या किंवा डाव टाकले गेले की त्यामुळे शरद पवार महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या निर्णायक स्थानापासून कायमचे ढळले. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करताना शरद पवारांना विचारलेच गेले नाही. याची कबुली त्यांनी स्वतःच देऊन टाकली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, आमदार धनंजय मुंडे या निर्णय प्रक्रियेतले महत्त्वाचे घटक तर होतेच. पण त्यापलीकडे जाऊन शरद पवारांच्या चुलत सुनेने म्हणजेच सुनेत्रा पवारांनी स्वतःहून उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला. याचाच अर्थ अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पुढे नेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयात त्यांना पार्थ पवार आणि जय पवार या दोन्ही मुलांनी साथ दिली.
– बाहेरून आलेल्या पवारांनी शरद पवारांना हरविले
सुनेत्रा पवार यांना शरद पवारांनी “बाहेरून आलेल्या पवार” म्हणून हिणवले होते. पार्थ पवारला आम्ही कवडीची किंमत देत नाही, असे म्हणाले होते. मात्र या बाहेरून आलेल्या पवारांनी आणि कवडीची किंमत नसलेल्या पवारांनीच शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णयातून “नॉन प्लस” करून टाकले. मग भले त्यांच्या मागे अमित शाह आणि भाजप यांच्यासारखी महाशक्ती उभी असेल तरीसुद्धा कौटुंबिक पातळीवर जो निर्णय घेणे अत्यंत अवघड होते तो निर्णय त्यांनी घेतला की राजकीय वस्तुस्थिती मान्यच करावी लागेल.
– अमित शाहांचा राजकीय इंधनपुरवठा
2019 मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग करून शरद पवारांनी फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच राजकीय दणका दिला नव्हता, तर तो राजकीय दणका अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना सुद्धा दिला होता. तो प्रत्यक्षात राजकीय विश्वासघात होता. पण मराठी माध्यमांनी मात्र त्याचे वर्णन पवारांची चाणक्यगिरी असे केले होते मराठी माध्यमांनी चाणक्यगिरी म्हणून वर्णन केले होते. पण काही झाले तरी विश्वासघात हा विश्वासघातच असतो. त्याला चाणक्यगिरीचा मुलांना देता येत नाही, हे अमित शाह यांनी नंतरच्या राजकारणातल्या प्रत्येक टप्प्यावर दाखवून दिले. अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला निर्णायक वळण दिले. अजित पवारांच्या कुटुंबीयांना राजकीय बळाचा इंधनपुरवठा करून त्यांनी आपल्याला हवा तसा म्हणजेच भाजपला अनुकूल ठरणारा निर्णय घ्यायला लावला.
– सुप्रिया सुळे सुद्धा “नॉन प्लस”
या सगळ्या प्रक्रियेतत शरद पवार हरले. अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर सुद्धा त्यांना कौटुंबिक किंवा भावनिक डाव टाकता आला नाही. त्यांनी तसा प्रयत्न जरूर करून पाहिला. अजित नसताना एवढा महत्त्वाचा निर्णय घ्यायची एवढी घाई कशाला??, अशा पुड्या सुद्धा पवारांच्या गोटातून गोविंदबागेतूनच सोडण्यात आल्या होत्या. गोविंदबागेतच शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार यांची बैठक झाली होती. पण सुनेत्रा पवार स्वतंत्रपणे निर्णय घेऊन मोकळ्या झाल्या. सुनेत्रा पवारांनी स्वतंत्रपणे निर्णय घेऊन शरद पवारांना हरविले. शरद पवार हे सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व पवारांच्या अख्ख्या कुटुंबात सुद्धा प्रस्थापित करू शकले नाहीत. पवार आणि सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या राजकारणात “नॉन प्लस” ठरले.
Thackerays non plus in mumbai and pawars in Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- अजितदादांचा वारस निवडण्यासाठी पडद्यामागे हालचाली; पवारांच्याच घरातून चर्चा तीन नावांची!!; नेमका अर्थ काय??
- UPSC : UPSC ची नवीन प्रणाली- IAS-IPS च्या कॅडर वाटपाचे नियम बदलले, 25 कॅडरचे 4 गटांमध्ये विभाजन, भौगोलिक झोन रद्द
- UGC : देशभरात UGCच्या नव्या नियमांचा विरोध; UPत सवर्ण तरुणांनी मुंडन केले; सर्वोच्च न्यायालय सुनावणीसाठी तयार
- अजितदादांचा राजकीय वारस एकटे पवार निवडू शकतील, की त्या निवडीत मोदी + शाहांचा वाटा सिंहाचा असेल??