विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीच्या घोषणेसाठी मुहूर्त काढलेला नाही, पण हा एक नवीन प्रयोग असल्याकारणाने याची मोठ्या जल्लोषात वाजत गाजतया घोषणा होणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.Thackeray Sena–MNS Alliance Announced With Fanfare, Sanjay Raut Says “Not Drama, But a Union of Affection”
राऊत म्हणाले की, मुंबईसह इतर नाशिक, कल्याण-डोंबिवली, ठाणे या ठिकाणच्या चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्या आहेत. काही ठिकाणच्या चर्चा या आता संपलेल्या आहेत. तरीही इतक्या मोठ्या महापालिका आहेत. शेवटपर्यंत त्या यादीवर हात फिरवला जातो. त्या दृष्टीने काम सुरू आहे. 23 तारखेपासून अर्ज भरण्यास सुरुवात आहे. पण त्याआधी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धुमधडाक्यात, वाजतगाजत केली जाईल.
या घोषणेसाठी कोणताही मुहूर्त काढलेला नाही. पण हा एक नवीन प्रयोग आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांचे दोन्ही पक्ष म्हणजेच आमचे पक्ष एकत्र निवडणुका लढत आहेत. फक्त मुंबई नाहीतर ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण-डोंबिवली, नाशिक या सर्वत्र दोन्ही बाजूच्या लोकांनी चर्चा पूर्ण केली आणि त्यावर आड दिवसभरात शेवटचा हात फिरवला जाईल, असे सांगून राऊत म्हणाले, आम्ही जे काही करतोय ते नाटक नसून प्रीतीसंगम आहे आणि महाराष्ट्राची जनता ही प्रीतीसंगमामध्ये सहभागी होईल. नाटक कुठले आहे, तर काल जे नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागले ते नाटक आहे. ज्या पद्धतीने चांगल्या नाटकाची तिकिटे ही तिकिट खिडकीवर संपतात आणि काही नाटकाची तिकिटे मालक स्वतः खरेदी करून रिकाम्या थेटरपुढे आमचा शो हाऊसफुल्ल असल्याचे नाटक करतात. कालचा शो हाऊसफुल्ल नव्हता. पण त्यासाठी प्रचंड पैसे खर्च करून तिकिटे खरेदी केली गेली आणि विकत दिली गेली. कालचा निकाल हा महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे, कसा लावला गेला.
Thackeray Sena–MNS Alliance Announced With Fanfare, Sanjay Raut Says “Not Drama, But a Union of Affection”
महत्वाच्या बातम्या
- मुंबईत स्वतंत्र, आघाडी इतरत्र; काँग्रेसच्या भूमिकेवरील संशय दूर; ठाकरे बंधूंच्या युतीत पवारांचा खोडा!!
- China Building : बांगलादेशात चीन उभारतोय एअरबेस आणि पाणबुडी तळ; संसदीय समितीचा अहवाल
- शालिनीताई पाटील : काँग्रेसच्या राजकीय वैभवशाली काळाच्या साक्षीदार हरपल्या!!
- पुणे, पिंपरी चिंचवड मधून नेत्यांचा ओघ भाजपकडे सुरू असताना आबा बागुल मात्र शिंदे सेनेत!!