प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ असा संघर्ष सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबर वरचा जुना वाद उकरून काढला, तर छगन भुजबळ यांनी नाशिक मध्ये उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला छेद दिला. Thackeray says, Amit Shah broke his word; Bhujbal says, Pawar distanced Shiv Sena from BJP!!
पोहरा देवीची शपथ घेऊन सांगतो, मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा शब्द मला दिला होता. तो शब्द त्यांनी मोडला, नाहीतर आत्ता शिवसेना अथवा भाजपचाच मुख्यमंत्री असता, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले.
- पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीतील हिंसाचारात १५ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा; अमित शाहांनी मागवला अहवाल
मात्र छगन भुजबळांनी या वक्तव्याला नाशिक मध्ये वेगळ्या पद्धतीने छेद दिला. शरद पवारांनी शिवसेनेला भाजपपासून दूर केले. त्यांनी नंतर भाजपलाही फसविले, असे वक्तव्य भुजबळाने नाशिक मधल्या पत्रकार परिषदेत केले.
2019 च्या निवडणुकीच्या वेळी अमित शहा यांनी मातोश्री मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत मातोश्री मध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यात अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटून घेण्याचा शब्द दिला होता. हे मी पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी अमरावतीत केले. भाजप विषयी याचा बोलण्यासाठी काही राहिले नाही. कारण भाजपने आधी पक्ष फोडले. आता पक्ष पळवतात, असा आरोप केला.
मात्र छगन भुजबळ यांनी 2014, 2017, 2019 आणि 2022 या चारही वेळेला शरद पवारांनीच शिवसेनेला भाजपपासून दूर ठेवायचा प्रयत्न केला. भाजपबरोबर त्यांनी वाटाघाटी केल्या. नंतर आयत्या वेळेला शब्द फिरवला, असा आरोप पत्रकार परिषदेत केला. अजित पवारांनी 5 जुलै च्या मेळाव्यात जो घटनाक्रम सांगितला, तोच छगन भुजबळांनी नाशिकच्या पत्रकार परिषदेत रिपीट केला.
त्यामुळे एकाच घटनेकडे दोन वेगवेगळे नेते कसे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतात, हे समोर आले.
Thackeray says, Amit Shah broke his word; Bhujbal says, Pawar distanced Shiv Sena from BJP!!
महत्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मीरमधील भूमिहीनांना जमीन देण्याच्या निर्णयाला विरोध, खोऱ्यातील नेत्यांना वाटतेय ही भीती
- WATCH : आता भगव्या रंगात दिसणार नवी वंदे भारत एक्स्प्रेस, रेल्वेमंत्री म्हणाले- तिरंग्यापासून घेतली प्रेरणा
- भारतात समान नागरी संहिता केवळ तत्त्वतःच शक्य, जावेद अख्तर यांचे मत
- गडचिरोली दौऱ्यावरून परतताना मुख्यमंत्री शिंदेंना दिसली रस्त्यावर बंद पडलेली रुग्णवाहिका, त्यानंतर…