Thursday, 8 May 2025
  • Download App
    ठाकरे - पवारांचे 2019 च्या निकालाआधीच "ठरले" होते; देवेंद्र फडणवीसांचे शरसंधान!!Thackeray-Pawar was decided before the 2019 results Devendra Fadnavis targets

    ठाकरे – पवारांचे २०१९ च्या निकालाआधीच “ठरले” होते; देवेंद्र फडणवीसांचे शरसंधान!!

    प्रतिनिधी

    मुंबई : २०१९ च्या विधानसभा निवडणुका भाजप-शिवसेनेने एकत्र लढविल्या. पण, निकालापूर्वीच शिवसेना – राष्ट्रवादीचे “ठरले” होते. त्यामुळे मी उद्धव ठाकरेंना वारंवार फोन करूनही, त्यांनी ते घेतले नाहीत, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. Thackeray-Pawar was decided before the 2019 results Devendra Fadnavis targets

    भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोपसत्रात ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, सेनापतीच्या मागे कार्यकर्ते भक्कमपणे उभे राहिले, तर लढाई जिंकता येते. पण इकडे सेनापती झाल्यानंतर मागचे सरदार पळून गेले. अशा शब्दांत त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचे अचानक ठरले नाही, तो निर्णय आधीपासूनच झाला होता. सत्तेसाठी नाही तर विचारांसाठी परिवर्तन झाले आहे.

    Uddhav Thackeray : भाजपवर हल्लाबोल करताना मुख्यमंत्र्यांच्या तोंडी काँग्रेसचीच भाषा!!

    युतीच्या काळात आम्ही शिवसेनेविरोधातील बंडखोर उमेदवार मागे घेतले. पण निकालापूर्वीच शिवसेना – राष्ट्रवादीचे “ठरले” होते. निकाल येण्याआधीपासूनच आपले सर्व मार्ग खुले आहेत, असे शिवसेना नेते सांगत होते. नंबर गेमसाठी शिवसेनेने ही भूमिका घेतली नाही, असा दावा फडणवीसांनी केला.

    अडीच वर्षे सूड उगवण्याचे काम

    महाविकास आघाडीच्या लोकांनी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांवर खटले दाखल केले. पण कोणी घाबरले नाही. अडीच वर्षे त्यांनी फक्त सूड उगवण्याचे काम केले. आमच्या विरोधात बोललात, तर घर तोडू, केस करू, 10 पोलीस चौक्या फिरवून पोलिसी खाक्या दाखवू, असा त्यांचा कार्यक्रम होता. अन्याय, अत्याचाराची परिसीमा त्यांनी गाठली. पण आपण सातत्याने संघर्ष केला. त्यामुळे आता महाराष्ट्राची जनता खुला श्वास घेत आहे, अशी टीका फडणवीसांनी केली.

    Thackeray-Pawar was decided before the 2019 results Devendra Fadnavis targets

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा

    Devendra Fadnavis : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ अन् स्मार्ट – देवेंद्र फडणवीस

    सिंदूर समर्पणाने श्रद्धांजली : वीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे ललिता सहस्रनाम पूजन आणि सिंदूर वितरण