• Download App
    सावित्रीच्या लेकींना सुरक्षा देण्यात ठाकरे - पवार सरकार अपयशी; भाजपाच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची घणाघाती टीका thackeray pawar govt on BJP National Secretary Vijaya Rahatkar's harsh criticism

    घरकोंबड्या सरकारच्या राज्यात महिलांनी स्व सुरक्षेसाठी कायदा हातात घ्यायचा का?; भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांचा संतप्त सवाल

    सावित्रीच्या लेकींना सुरक्षा देण्यात ठाकरे – पवार सरकार अपयशी; भाजपाच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची घणाघाती टीका


    प्रतिनिधी

    मुंबई : बीड, साकीनाका, परभणी , डोंबिवलीसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी बलात्कार आणि महिलांवरच्या अत्याचारांच्या घटना घडल्या तरी राज्यातील निर्भयांचा आक्रोश ठाकरे – पवार
    सरकारच्या कानी पडलेला नाही. महिला सुरक्षेच्या विषयात आघाडी सरकारची बेफिकीरी आणि निष्क्रीयता चीड आणणारी आहे. आता महिलांनी स्व सुरक्षेसाठी स्वत:च कायदा हाती घ्यायचा की घरकोंबड्या सरकारप्रमाणे त्यांनीही घरातच बसून रहायचे?, असा संतप्त सवाल भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी पत्रकार परिषदेत केला. महिलांची सुरक्षा करण्यात अपयशी ठरलेल्या आघाडी सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकारच नाही, असे घणाघाती टीकास्त्रही त्यांनी सोडले.  thackeray pawar govt on BJP National Secretary Vijaya Rahatkar’s harsh criticism


    उद्धवजी, अन्य राज्यांबद्दल बोलण्याऐवजी विशेष अधिवेशनात शक्ती कायदा संमत करा… विजया रहाटकरांची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका


    या पत्रकार परिषदेत विजया रहाटकर यांनी महिला सुरक्षाप्रश्नी ठाकरे – पवार सरकारच्या अपयशाचा पाढाच वाचून दाखविला. त्या म्हणाल्या की, ह्या सरकारने दोन वर्षे महिला सुरक्षेसंदर्भात केवळ घोर निराशा आणि फसवणूक केली आहे . ज्या छत्रपति शिवरायांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडीचोळी देऊन सन्मानाने घरी पाठवले, त्या छत्रपतींचा दाखला वेळोवेळी देणाऱ्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यच रोजच महिलांचा अवमान करताना दिसत आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी तत्कालिन गृहमंत्र्यांनी २०१९ च्या हिवाळी अधिवेशनात शक्ती कायदा आणण्याच्या घोषणा केल्या. तो कायदा अजूनही लागू झालेला नाही. महिला अत्याचारप्रश्नी चहुबाजूंनी रान उठविल्यानंतर जवळपास दीड वर्षांनंतर अखेर सरकारला महिला आयोग अध्यक्षपदाच्या नियुक्तीचा ऑक्टोबर २०२१ हा मुहूर्त सापडला. वाढत्या अत्याचाराविरोधात आंदोलन असो अथवा भाजपाच्या १२ महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र असो प्रत्येक वेळी भाजपाने “धक्का” दिला की या सरकारची गाडी हलणार अशी स्थिती राज्यात आहे.

    केंद्रातील मोदी सरकार महिला सबलीकरणासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. तसेच महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिला अत्याचार रोखण्यासाठी 2020 साली नवी नियमावलीही जाहीर करण्यात आली. त्यानुसार महिलांवरील अत्याचाराचा एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ केल्यास पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई, बलात्काराचा तपास दोन महिन्यांत पूर्ण करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, महाराष्ट्रात एफआयआर नोंदवण्यात हलगर्जी, पीडितेचा जबाब नोंदवून घेण्यात टाळाटाळ होत आहे.

    विजया रहाटकर म्हणाल्या की, महिला अत्याचारांच्या असंख्य घटना घडत असताना सरकारमधील मंत्र्यांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही. एका मंत्र्याला तरुणीच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप झाल्याने राजीनामा द्यावा लागला, तर दुसरे मंत्री सेलिब्रिटींच्या मुलाच्या अटकेविरोधात आणि जावयांवरील कारवाई विरोधात पत्रकार परिषदा घेण्यात आणि वायफळ चर्चा करण्यात मग्न आहेत. लोकप्रतिनिधी, राष्ट्रवादी युवा प्रदेशाध्यक्ष यांच्यावर सत्तेचा गैरवापर करत महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप होत आहेत.

    लखीमपूर प्रकरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांना राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना दिसत नाहीत. महाराष्ट्र बंदसाठी जितकी यंत्रणा कामाला लावली गेली तितकी मेहनत जर महिला सुरक्षेसाठी केली असती तर लेकीसुनांना सुरक्षित वाटले असते, असा टोलाही त्यांनी ठाकरे – पवार सरकारला लगावला.

    thackeray pawar govt on BJP National Secretary Vijaya Rahatkar’s harsh criticism

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस