विशेष प्रतिनिधी
पुणे : ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्याचे कारण पुढे करून ठाकरे – पवार सरकार महाराष्ट्रातल्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलत आहे. यातून सरकारला काही वेगळे साध्य करून घ्यायचे आहे. त्यात काळंबेरं आहे, असा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. Thackeray – pawar govt avoiding muncipal elections in the name of OBC political reservation
राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या पुणे दौऱ्यात सध्या वाढ झाली आहे. आजही ते पुन्हा एकदा पुण्यात आले असून त्यांनी पुण्यातल्या मनसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातल्या ओबीसी आरक्षणासह अनेक प्रश्नांवर आपली मते मांडली.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, निवडणुका आत्ता नकोत हे सरकारच्या फायद्याचे आहे. त्यात काही काळंबेरं आहे तर ते आपल्याला समजावून घेतले पाहिजे. सगळ्या महानगरपालिका सरकारच चालवणार. मग त्यावर प्रशासक नेमणार आणि मग सरकारच बघणार. हे सगळे सरकारचे धंदे चालू आहेत. मला तर असे वाटतेय की ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय पुढे करून हे सरकार आपल्या स्वार्थाच्या काही गोष्टी साध्य करून घेईल.
Thackeray – pawar govt avoiding muncipal elections in the name of OBC political reservation
महत्त्वाच्या बातम्या
- दीड कोटी अफगाण नागरिकांना दोनवेळचे जेवण महाग; भीषण अन्नटंचाईने अफगणिस्तानमध्ये अन्नसंकट
- अफगाणिस्तानच्या पंजशीरमध्ये सुमारे 600 तालिबान मारले गेले, प्रतिकार दलाचा दावा
- जेईई मेन्सच्या पेपरफुटीप्रकरणी एनएसयुआय करणार देशभर निदर्शने
- केंद्रीय कायदा मंत्री पहिल्यांदा भेटले तेव्हा सरन्यायाधीशांना वाटले कोणी कॉलेज तरुणच आहे!