• Download App
    ठाकरे - पवार सरकारने मराठा समाजाची माफी मागावी पुन्हा आरक्षण मिळवून द्यावे - नितेश राणे |Thackeray - Pawar government should apologize Maratha community

    WATCH : ठाकरे – पवार सरकारने मराठा समाजाची माफी मागावी पुन्हा आरक्षण मिळवून द्यावे – नितेश राणे

    विशेष प्रतिनिधी

    ठाणे – महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारने गेल्या दोन वर्षांत मराठा समाजाचे गंभीर नुकसान केले असून त्याबद्दल या सरकारने समाजाची माफी मागितली पाहिजे आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी ठोस काम केले पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी केली.Thackeray – Pawar government should apologize Maratha community

    ठाकरे – पवार सरकारने दोन वर्षांत मराठा समाजाची कशी फसवणूक केली याची माहिती देण्यासाठी पक्षातर्फे ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार निरंजन डावखरे, भाजपाचे प्रदेश सचिव संदीप लेले, सरचिटणीस विलास साठे, उपाध्यक्ष सागर भदे उपस्थित होते.



    नितेश राणे म्हणाले, “ठाकरे सरकारने गंभीर चुका केल्यामुळे आणि सरकारच्या बेफिकीरीमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले. या सरकारमुळे सर्वोच्च न्यायालयाने सर्वप्रथम मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आणि नंतर ते रद्द केले. त्यानंतर ठाकरे सरकारने मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी कोणतेही गंभीर प्रयत्न केलेले नाहीत.

    या सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिकेसाठी पाठपुरावा केलेला नाही किंवा न्या. भोसले समितीने केलेल्या शिफारशींनुसार पावले टाकलेली नाहीत. हे सरकार मराठा आरक्षण हा विषयच विसरून गेल्यासारखी स्थिती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असेच या सरकारचे धोरण दिसते.

    • ठाकरे – पवार सरकारने मराठा समाजाची माफी मागावी
    • आरक्षण मिळवून देण्याआठी प्रयत्न करावेत
    • दोन वर्षांत मराठा समाजाची फसवणूक केली
    • ठाकरे सरकारने गंभीर चुका केल्याचा परिणाम
    • सरकारच्या बेफिकीरीमुळे आरक्षण गमावले
    • सर्वोच्च न्यायालयाकडून आरक्षणाला स्थगिती
    • सरकार मराठा आरक्षण हा विषयच विसरून गेले

    Thackeray – Pawar government should apologize Maratha community

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ