प्रतिनिधी
मुंबई : जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यांत पूरपरिस्थिती उद्भवली. यात शेतपिकांच्या झालेल्या नुकसानासाठी, नुकसानग्रस्तांना मदत म्हणून ठाकरे – पवार सरकारने ७ ऑक्टोबर रोजी ३६५ कोटी ६७ लाख रुपये इतका निधी मंजूर केला आहे.Thackeray: Pawar government announces Rs 365 crore package in October
या मदतीमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सर्व कार्यान्वयन यंत्रणांनी तात्काळ मदत नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचेल याची दक्षता घेण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी?
अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्तांना मदत म्हणून पुणे विभागासाठी १५० कोटी १२ लाख रुपये, कोकण विभागासाठी ८ कोटी ५१ लाख रुपये, अमरावती विभागासाठी ११८ कोटी ४१ लाख रुपये, नाशिक विभागासाठी १ लाख रुपये, औरंगाबाद विभागासाठी ७७ कोटी ९७ लाख रुपये, नागपूर विभागासाठी १० कोटी ६५ लाख रुपये याप्रमाणे एकूण ३६५ कोटी ६७ लाख इतका निधी मंजूर झाला आहे.
राज्यात जुलै २०२१ च्या अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यांत पूरस्थिती उद्भवली. यामुळे पिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना मदतीच्या वाटपासाठी ३६५ कोटी ६७ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
पूरपरिस्थितीची पाहणी करुन निर्णय
अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार तसेच मंत्रीमंडळातील सर्व सदस्यांनी पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून तेथील शेतकऱ्याशी संवाद साधला. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या. या अनुषंगाने महसूल व वन विभागाने निधी मंजुरीचा शासन निर्णय जारी केला आहे.
तातडीने निधी वितरित करणार
पूरपरिस्थितीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानामुळे नुकसानग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून एकूण ३६५ कोटी ६७ लाख इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली असून, विजय वडेट्टीवार यांनी तातडीने विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.
Thackeray: Pawar government announces Rs 365 crore package in October
महत्त्वाच्या बातम्या
- आता मुलीही लष्करी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ शकतील, संरक्षण मंत्रालयाने दिली मंजुरी , पुढील सत्रापासून प्रवेश सुरु
- युपीएससी इंटरव्ह्यूमध्ये सर्वात जास्त स्कोर मिळवलेल्या डॉ. अपला मिश्राने मुलाखतीत ‘ही’ उत्तरे दिली होती
- मेनका गांधी वरुण गांधी यांनी भाजप बाहेरची वाट पकडली??; राष्ट्रीय कार्यकारणीतून वगळले
- भाजपची ८१ जणांची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; महाराष्ट्रातून गडकरी, गोयल, फडणवीस, चंद्रकांतदादा, विजया रहाटकर, मुंडे, तावडे