• Download App
    ठाकरे सरकारची मोठी घोषणा ! अतिवृष्टी, पूरग्रस्तांना मिळणार १० हजार कोटींचं पॅकेज|Thackeray government's big announcement! 10,000 crore package for flood victims

    ठाकरे सरकारची मोठी घोषणा ! अतिवृष्टी, पूरग्रस्तांना मिळणार १० हजार कोटींचं पॅकेज

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे.Thackeray government’s big announcement! 10,000 crore package for flood victims

    राज्यात जून २०२१ पासून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी तसेच पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले.पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागतंय.



    दरम्यान या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या अटींची वाट न पाहता ठाकरे सरकारने १० हजार कोटींचे अर्थसहाय्य जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

    अशी असेल मदत

    १)जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर
    २) बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर
    ३)बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर

    दरम्यान ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येईल.

    Thackeray government’s big announcement! 10,000 crore package for flood victims

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक