• Download App
    पूरग्रस्त दौऱ्यात ठाकरे – फडणवीस कोल्हापूरच्या शाहुपुरीत आमने – सामने; पुसले एकमेकांचे क्षेमकुशल, फडणवीसांनी केल्या पूरग्रस्तांसाठी अनेक मागण्या|Thackeray-Fadnavis face-off in flood-hit Kolhapur Pusle each other's well-being, many demands for flood victims made by Fadnavis

    पूरग्रस्त दौऱ्यात ठाकरे – फडणवीस कोल्हापूरच्या शाहुपुरीत आमने – सामने; पुसले एकमेकांचे क्षेमकुशल, फडणवीसांनी केल्या पूरग्रस्तांसाठी अनेक मागण्या

    प्रतिनिधी

    कोल्हापूर : २५ – ३० वर्षांची राजकीय वैचारिक मैत्री तोडून वायले झालेले शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि भाजपचे प्रमुख नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दररोज एकमेकांवर तोफा डागत असतात. पण कोल्हापूरमध्ये ते आज अचानक एकमेकांसमोर आले.Thackeray-Fadnavis face-off in flood-hit Kolhapur Pusle each other’s well-being, many demands for flood victims made by Fadnavis

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरच्या शाहूपुरी भागात दौऱ्यावर असताना अनेक नागरिकांशी संवाद साधला. या भागात नागरिकांशी संवाद साधत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा तेथे आले.



    फडणवीस यांनी लगेच पूरग्रस्तांच्या व्यथा त्यांना सांगितल्या आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याची विनंती केली. तसेच या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना शोधण्याची सुद्धा गरज असल्याने एक बैठक तातडीने बोलवावी, अशी मागणी सुद्धा केली. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे यावेळी उपस्थित होते.

    या अचानक भेटीची मोठी बातमी झाली. एरवी ठाकरे आणि फडणवीस यांची रिलेशनशीप लव्ह – हेटची मानली जाते. परंतु, आज कोल्हापूरच्या शाहुपुरी भागात ते एकमेकांना भेटल्यानंतर त्यांनी पूरग्रस्तांच्या प्रश्नावर तर चर्चा केलीच. पण एकमेकांचेही क्षेमकुशल विचारले.

    “शाहूपुरी भागात दौऱ्यावर असताना अनेक नागरिकांशी संवाद साधला. या भागात नागरिकांशी संवाद साधत असतानाच मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी हे सुद्धा तेथे आले असता पूरग्रस्तांच्या व्यथा त्यांना सांगितल्या आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याची विनंती केली,

    तसेच या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना शोधण्याची सुद्धा गरज असल्याने एक बैठक तातडीने बोलवावी, अशी मागणी सुद्धा केली. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे यावेळी उपस्थित होते,” असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले.

     

    Thackeray-Fadnavis face-off in flood-hit Kolhapur Pusle each other’s well-being, many demands for flood victims made by Fadnavis

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ