• Download App
    Thackeray Ex-Corporators Join BJP, Shelar Criticizes ठाकरेंच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश;

    Ashish Shelar : ठाकरेंच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; उबाठा सेनेची अवस्था जीर्ण, मंत्री शेलार यांचे टीकास्त्र

    Ashish Shelar

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Ashish Shelar  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या 100 हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात भाजप जाहीर प्रवेश केला. मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आमदार प्रविण दरेकर आणि मुंबई भाजपचे उपाध्यक्ष कमलाकर दळवी देखील उपस्थित होते.Ashish Shelar

    यावेळी मंत्री शेलार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने प्रेरित होऊन तसेच भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणांशी एकरूप होऊन काम करण्याची इच्छा व्यक्त करत शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या 100 हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. याचा अर्थ त्यांनी उबाठाचे नेतृत्व नाकारले आहे. हा या नाटकाचा पहिला अंक आहे. लवकरच दुसरा आणि तिसरा व शेवटचा अंक तुम्हाला पाहायला मिळेल.



    उबाठाची अवस्था धोकादायक आणि जीर्ण झाली आहे. त्यांनी मुंबई, मुंबईकर, हिंदुत्व, हिंदु सण उत्सव यांच्या विरोधात भूमिका घेतली त्यामुळे ते धोकादायक स्थितीत आहेत, तर त्यांना सोडून ज्या पद्धतीने पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार जात आहेत, त्यावर तो पक्ष जीर्ण अवस्थेत आहे, असे आशिष शेलार म्हणाले.

    मुंबईत भाजप 1 नंबरचा पक्ष झाला

    2017 च्या निवडणुकीत त्यावेळच्या शिवसेनेपेक्षा भाजपला फक्त दोन जागा कमी होत्या. आता भाजपमध्ये चार माजी नगरसेवकांनी प्रवेश केल्यानंतर भाजप नंबर 1 चा पक्ष झालाच. शिवाय मूळ शिवसेनेतील 50 हून अधिक नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. त्यामुळे उबाठा सेना हा पक्ष अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे, अशी टीका शेलार यांनी केली.

    आमची लढाई देव, देश आणि धर्मासाठी

    देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मुंबईला 5 लाख कोटींचा निधी दिला. आम्ही मुंबईकरांची सेवा करीत असून देव, देश आणि धर्मासाठी आमची लढाई सुरु आहे, असेही ते म्हणाले.

    Thackeray Ex-Corporators Join BJP, Shelar Criticizes

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sangeet Sannyasta Khadga : ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकावरून वाद पेटला, गौतम बुद्धांचा अवमान झाल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप

    jayant patil : जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार; शरद पवारांशी चर्चा करून 2 दिवसांत राजीनाम्याची शक्यता

    महापालिका + झेडपी निवडणुकांचा महायुतीचा खरा फॉर्म्युला; ठाकरे + पवार ब्रँड गुंडाळा, अख्खा महाराष्ट्र आपसांतच वाटून घ्या!!