• Download App
    Thackeray brothers ठाकरे बंधूंनी गाजवला मराठीचा मुद्दा, पण पवारांच्या हाती लढायला मुद्दाच लागेना!!

    ठाकरे बंधूंनी गाजवला मराठीचा मुद्दा, पण पवारांच्या हाती लढायला मुद्दाच लागेना!!

    नाशिक : ठाकरे बंधूंनी गाजवला मराठीचा मुद्दा, पण पवारांच्या हाती लढायला मुद्दाच लागेना!!, अशी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था होऊन बसली. Thackeray brothers

    ठाकरे बंधूंच्या पक्षांनी मीरा-भाईंदर मधला मराठी मोर्चा यशस्वी करून दाखवला. भाजप आणि ठाकरे बंधू यांच्यात अमराठी आणि मराठी लोक विभागले गेले. एकनाथ शिंदेंचे मंत्री प्रताप सरनाईक त्या मोर्चात गेले, पण 50 खोके एकदम ओके म्हणून मोर्चातल्या कार्यकर्त्यांनी त्यांना हाकलून दिले. पोलिसांनी मनसैनिकांना अटक केली, तरी पोलीस मोर्चा रोखू शकले नाहीत. मनसैनिकांना ज्या मार्गावरून मोर्चा काढायचा होता, त्याच मार्गाने त्यांनी मोर्चा काढला. मराठी लोकांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिवसेना आणि मनसेचे नेते पुन्हा एकदा एकत्र दिसले. बाळासाहेब ठाकरे यांनी कारवर उभे राहून भाषणे केले होते त्याची कॉपी करून शिवसेना आणि मनसेचे नेते ट्रकवर उभे राहिले. त्याच्या टपावरून त्यांनी भाषणे केली. मराठी महिलांनी या मोर्चाला जोरदार प्रतिसाद दिला. Thackeray brothers

    पण या मोर्चाच्या राजकारणावरून खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवारांनी फडणवीस सरकारला घेरले. फडवीसांच्या सरकारने परप्रांतीय व्यापाऱ्यांना मोर्चा काढायची परवानगी दिली, पण मराठी लोकांना परवानगी दिली नाही कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली मराठी लोकांचा हक्क नाकारला याला सर्वस्वी गृह खाते जबाबदार आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. रोहित पवारांनी याच आरोपाची री ओढली.

    पण त्या पलीकडे जाऊन सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना नवा कुठला मुद्दाच मिळाला नाही. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त शरद पवारांनी त्यांचा सत्कार केला त्यावेळी पवारांनी जोरदार पुरोगामी भाषण केले. महाराष्ट्राचे सरकार फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर चालत नाही. महाराष्ट्राला पुन्हा जुन्या पुरोगामी सामाजिक वळणावर आणायचे असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्ष आणि अन्य पक्षांनी एकजुटीने काम केले पाहिजे, असे आवाहन पवारांनी केले.



    पण एवढे सगळे करताना शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार या सर्वाधिक काँग्रेसच्या एकाच घरातल्याच नेत्यांना फडणवीस सरकार विरुद्ध लढण्यासाठी स्वतःचा खरा मुद्दाच हाती लागला नाही. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले. वरळीतल्या ऐक्याच्या सभेनंतर त्यांनी मीरा-भाईंदर मधला मोर्चा यशस्वी करून दाखवला. मराठीचा मुद्दा व्यवस्थित तापवला. भाजपकडे अ मराठी मध्ये आणि ठाकरे बंधूंकडे मराठी मते अशा राजकीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला. पण यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष भरडले गेले.

    पण काही झाले तरी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी आज सत्तेमध्ये तरी आहेत. भाजपने त्यांना सत्तेच्या वळचणीला घेऊन ठेवले आहे. भाजपची मर्जी असेल तोपर्यंत ते सत्तेच्या वळचणीला टिकून राहतील.

    – काँग्रेसची गोची

    पण या सगळ्या तापलेल्या राजकीय वातावरणात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस मात्र पुरत्या खोपच्यात गेल्या. त्यांच्या हाती कुठलाच मुद्दा लागला नाही. उलट ठाकरे बंधूंनी तापवलेल्या मराठी मुद्द्याच्या पाठीमागे त्यांची फरफट झाली. शरद पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याने स्वतःला स्थानिक साखर कारखान्याच्या निवडणुकीत गुंतवून घेतले. पण त्यांनी लक्ष घालून देखील त्यांचे पॅनेल अजित पवारांच्या समोर हरले. काँग्रेसला तर मराठी विरुद्ध अमराठी हा वादच झेपला नाही. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना ठाकरे बंधूंची बाजू उचलून धरावी लागली.

    Thackeray brothers raised the issue of Marathi, but Pawar did not have any issue to fight for!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : विरोधी पक्षनेता नसणे म्हणजेच लोकशाहीचा गळा घोटणे, विधानसभेत गदारोळ करतविरोधकांचा कामकाजावर बहिष्कार

    निशिकांत दुबे यांनी दिली उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचाराची यादी; पण “नॅचरल करप्ट पार्टीच्या” सोबतीची कुणी घ्यायची जबाबदारी??

    Raheel Khan : राहील खानच्या वर्तनाचा मनसेकडून निषेध, पक्षाचा कोणताही संबंध नाही; पोलिस कारवाईची मागणी