• Download App
    Thackeray brothers ठाकरे झुंजले; पवार हरले : मुंबईत ठाकरे बंधूंची भाजपला कडवी टक्कर; काँग्रेस आणि अपक्षांच्या पाठिंब्यावर ठरू शकतो महापौर!!

    ठाकरे झुंजले; पवार हरले : मुंबईत ठाकरे बंधूंची भाजपला कडवी टक्कर; काँग्रेस आणि अपक्षांच्या पाठिंब्यावर ठरू शकतो महापौर!!

    नाशिक : महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुका जिंकल्याचे सेलिब्रेशन भाजपने केले असले, तरी मुंबईत ठाकरे बंधूंनी भाजपला कडवी टक्कर दिली. सायंकाळी उशिरा काही ठिकाणचे आकडे फिरले आणि भाजपा 100 वरून घसरून 84 वर येऊन ठेपली. शिंदेंच्या शिवसेनेला 26 जागा मिळाल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 63 तर मनसेला 7 जागा मिळाल्या. काँग्रेसला 23 जागा मिळाल्या तर अपक्षांना 10 जागा मिळाल्या. भाजपची शंभर वरून झालेली घसरण आणि उद्धव ठाकरेंच्या 57 वरून 63 वर पोहोचलेला आकडा यामुळे मुंबईच्या निकालात मोठा फेरबदल झाला. Thackeray brothers

    त्यामुळे मुंबईत भाजप आणि शिवसेनेने बहुमताचा आकडा गाठला नाही तर काँग्रेस आणि अपक्षांच्या बळावर ठाकरेंचा महापौर बसू शकतो, असे चित्र निर्माण झाले. मुंबईत ठाकरे झुंजले, पण पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये पवार हरले.



    मुंबईत भाजप आणि शिंदे सेना बहुमताच्या आकड्याजवळ पोहोचली असली, तरी तिला अद्याप बहुमताचा आकडा ओलांडता आलेला नाही. पण काही झाले तरी मुंबई ठाकरे बंधूंनी भाजप आणि शिवसेना यांना जोरदार टक्कर दिली हेच राजकीय सत्य या आकडेवारीतून समोर आले.

    त्या उलट भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आलेले अजित पवार आणि त्यांच्याबरोबर आलेले शरद पवार यांना भाजपने पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये जोरदार धोबीपछाड दिला. या निवडणुकीत ठाकरेंपेक्षा पवारच biggest looser ठरले. त्यामुळे महाराष्ट्रात ठाकरे झुंजले, पवार हरले, हेच चित्र महाराष्ट्रात अधोरेखित झाले.

    – देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य

    आपण महाराष्ट्रात महापालिका निवडणुका जिंकल्या, पण आपण मुंबईत महापौर बसविल्यानंतर सेलिब्रेशन करू, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मुंबईतल्या मुख्यालयात केले होते. त्याचवेळी मुंबईतल्या भाजपच्या यशाविषयी अनेकांनी शंका व्यक्त केल्या होत्या‌. त्या मतमोजणीच्या आकडेवारीतून समोर आल्या.

    Thackeray brothers fought back in Mumbai, but Pawars lost in Pune and PCMC

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पवार ब्रँडचा वाजवला बोऱ्या; चल रे तू टुणुक टुणुक भोपळ्या!!

    विजयाच्या उत्सवाच्या भाषणात फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंचे अभिनंदन; राष्ट्रवादीचाही उल्लेख, पण अजितदादांचे नावही नाही घेतले!!

    ठाकरे ब्रँडचा दबदबा संपला; पवार ब्रँडची राजकीय प्रतिष्ठा धुळीला मिळाली!!