महाराष्ट्रात फार मोठा राजकीय संगर होऊन ठाकरे बंधू ठरले लढवय्ये; पण शरद पवार ठरले पुतण्या पुढे शरणागत!!, हेच राजकीय वास्तव चित्र 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने आज समोर आले.
महापालिका निवडणुकांचा अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ज्या पद्धतीचे राजकारण सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आले, ते पाहता ठाकरे बंधूंनी स्वतःच्या राजकारणाची व्यवस्थित व्यूहरचना करून योग्य वेळेला युती साधली. त्या उलट शरद पवारांना आपल्या पुतण्या पुढे शरणागती सुद्धा व्यवस्थित पत्करता आली नाही. त्यासाठी त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना उघड किंवा गुप्त बैठका घ्याव्या लागल्या. जेमतेम दोन ठिकाणी एकत्र यावे लागले. ते सुद्धा धडपणे नाही, तर गुप्त बैठका घेऊन. शरद पवारांच्या पक्षाची पुरती वाताहत झाली. ती त्यांना उघड्या डोळ्यांनी पाहावी लागली.
– ठाकरे बंधूंचे राजकारण उघड भाजप विरोधी
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी आपला भाजप विरोधातला संघर्ष कायम ठेवला. त्यांनी आपण भाजपा बरोबर जाऊ, अशी कुठलीही चिन्हे छुप्या किंवा उघड पद्धतीने दाखविली नाहीत. दोन गुजरात्यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या भाजपच्या नेतृत्वाशी आपला संघर्ष आहे आणि तो आम्ही कायम लढणार आहोत हे चित्र निर्माण करण्यात ठाकरे बंधू यशस्वी ठरले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे आपली युती संपूर्ण महाराष्ट्राला सांगितली. जागावाटपाची बोलणी सुद्धा यशस्वी केली. किरकोळ दोन-चार ठिकाणी जागांचे मतभेद सोडता इतरत्र सगळीकडे ठाकरे बंधू युती म्हणून लढणार हे राजकीय वास्तव महाराष्ट्राच्या जनमानसावर ठसविण्यात ते यशस्वी ठरले. इतकेच काय पण मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक अशा ठिकाणी ठाकरे बंधू एकत्रित जाहीर सभा घेणार, असे शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी उघडपणे सांगितले.
– शरद पवारांचे तळ्यात मळ्यात
त्या उलट शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तळ्यात मळ्यात करत राहिली. पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना पवारांच्या मनातले खरे ओळखताच आले नाही. पवार आणि सुप्रिया सुळे यांनी बारामतीत गौतम अदानींचा कार्यक्रम घेतला. त्यासाठी त्यांनी महापालिका निवडणुकांचा “मुहूर्त” निवडला. त्यामुळे पवारांच्या राजकीय भूमिकेविषयी आधीच असलेले संशयाचे वातावरण जास्त गडद झाले. शरद पवारांना पुणे आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये शहराध्यक्ष गमवावे लागले. प्रशांत जगताप आणि राखी जाधव यांनी शरद पवारांचे राष्ट्रवादी सोडली, पण त्याचवेळी शरद पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात मग्न राहिले. पवार काका – पुतण्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये एकमेकांशी जुळवून घेतले. पण त्यांनी कार्यकर्त्यांची वाताहत केली. विशेषतः शरद पवार आपल्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना संभाळू शकले नाहीत. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये एकत्र येताना शरद पवारांचे नेते अमोल कोल्हे आणि रोहित पवारांना अजित पवारांबरोबर गुप्त बैठका घ्याव्या लागल्या. त्यांना उघडपणे एकत्र येता आले नाही. शरद पवारांच्या पक्षातल्या जितेंद्र आव्हाड, मेहबूब शेख त्यांच्यासारख्या तोफा निकामी झाल्या. कारण त्यांच्यासारख्या कट्टर समर्थकांनी आपल्या कुठल्या भूमिकेचे समर्थन करावे, असे काही पवारांनी शिल्लकच ठेवले नाही.
– राजकीय वास्तव चित्र
या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे ठाकरे बंधू खऱ्या अर्थाने लढवय्ये आहेत, तर शरद पवार आपल्या पुतण्याच्या सत्तेपुढे शरणागत झालेत, हेच राजकीय वास्तव चित्र निर्माण झाले.
– ठाकरेंच्या ऐवजी पवारांचीच लागली वाट
शरद पवारांनी दोन-चार वर्षांपूर्वी याच ठाकरे बंधूंना आपल्या नादी लावून शिवसेना आणि मनसे यांची वाताहत करायचे ठरविले होते. त्यानुसार त्यांच्या पक्षांची वाताहत झाली हे खरे, पण पवार ठाकरे बंधूंना खऱ्या अर्थाने संपवू शकले नाहीत. त्या उलट ठाकरे बंधू आपले राजकीय अस्तित्व टिकवून धरण्यात यशस्वी ठरले. पण त्या पलीकडे जाऊन भाजप विरोधातला मोठा चेहरा बनले, तर पवार मात्र पुतण्यापुढे शरणागत होऊन केवळ आपल्या कन्येसाठी आपल्या कट्टर समर्थकांना गमावून बसले. राजकीय आयुष्याच्या अखेरीस पवारांच्या पदरात “हे” पडले. किंबहुना त्यांनी ते स्वतःहून “पाडून” घेतले!!
Thackeray brothers fighters; but Sharad Pawar became political refugee
महत्वाच्या बातम्या
- मुंबईत “ठाकरे राजा” काँग्रेसपेक्षा “उदार’ झाला; शरद पवारांच्या पक्षाला एकावर भोपळा दिला!!; मागितल्या 52, दिल्या 10!!
- Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही
- Japan Road Accident : जपानमध्ये 60 हून अधिक गाड्यांची धडक, अनेक गाड्या जळून खाक, 2 ठार, 26 जखमी
- US Snow Storm : अमेरिकेत बर्फाच्या वादळामुळे हजारो विमानांची उड्डाणे रद्द, 3 वर्षांतील सर्वाधिक बर्फवृष्टी