विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांसकट ठाकरे बंधू मुंबईच्या सत्याच्या मोर्चात; पण देवेंद्र फडणवीस मात्र बिहार निवडणुकीच्या प्रचारात!!, असे आजच्या दिवसभरातले राजकीय चित्र राहिले पण त्यातले अर्धेच चित्र मराठी माध्यमांनी दाखविले.Thackeray brothers along with Pawar and Congress leaders at the truth march in Mumbai
मराठी माध्यमांनी सगळ्या बातम्यांचा फोकस ठाकरे बंधू आणि सत्याच्या मोर्चावर ठेवला. सत्याच्या मोर्चामध्ये राज ठाकरे यांच्या भाषणाला सर्वाधिक प्रसिद्धी दिली. त्या मोर्चात काँग्रेस नेत्यांचे आणि उद्धव ठाकरे यांचीही भाषणे झाली शरद पवारांचे समारोपाचे भाषण झाले. त्या भाषणांच्या छोट्या-मोठ्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या.
– भाजपचा मूक मोर्चा
पण त्याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सत्याच्या मोर्चाकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपले लक्ष बिहार मधल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर लावले होते. हे मात्र मराठी माध्यमांनी सांगितले नाही. सत्याच्या मोर्चाच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश भाजपने मूक मोर्चा काढला. त्या मोर्चाचे नेतृत्व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केले. त्या मोर्चाला मंत्री मंगल प्रभात लोढा हजर होते, पण मंत्री आशिष शेलार आणि बाकीचे भाजपचे मंत्री या मूक मोर्चा कडे फिरकले सुद्धा नाहीत. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मूक मोर्चा कडे पाठ फिरवली होती.
देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये प्रचारात
देवेंद्र फडणवीस यांनी आज आपले सगळे लक्ष बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर केंद्रित केले होते. त्यांनी आज बिहार मधल्या भाजप आघाडीचे उमेदवार मृणाल, अंकित कुमार, जनक सिंग यांच्या प्रचारासाठी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन सभा घेतल्या. बिहार विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जोरदार सभा होत आहेत. त्यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस देखील प्रचारात आघाडीवर आलेत. पण देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळपर्यंत सत्याच्या मोर्चावर साधी प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केली नव्हती. पण फडणवीस यांच्या या बिहार दौऱ्याची मराठी माध्यमांनी मात्र फारशी दखल घेतली नाही. त्यांनी फक्त ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखालच्या सत्याच्या मोर्चावर आपले लक्ष केंद्रित केले होते.
Thackeray brothers along with Pawar and Congress leaders at the truth march in Mumbai; but Devendra Fadnavis is campaigning for the Bihar elections!!
महत्वाच्या बातम्या
- Kesari Sikandar Sheikh : महाराष्ट्र केसरी सिकंदरला शस्त्र तस्करीप्रकरणी पंजाबमध्ये अटक; पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचा संशय
- Bengaluru : बंगळुरूत जोडप्याने फूड डिलिव्हरी एजंटला चिरडले; स्कूटर कारला खेटून गेल्याने 2 किमी पाठलाग करून धडक
- Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी म्हणाली- दाऊद दहशतवादी नाही, मुंबई बॉम्बस्फोट त्याने घडवून आणले नाहीत, मी त्याला कधीच भेटले नाही
- Gujarat : गुजरातेत गर्भपातावर सुनावणी सुरू असताना अल्पवयीन पीडिता प्रसूत; 15 वर्षीय रेप पीडितेचा खटला; राज्याला 6 महिन्यांचा खर्च उचलण्याचे आदेश