नाशिक : राज्यातल्या 288 नगरपालिका नगरपंचायती नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या निकालाच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप शिंदे सेना आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी यांनी जोरदार आघाडी घेतली. त्यातही भाजपने इतर सर्व पक्षांवर मात केली. त्यांच्या खालोखाल शिंदे सेनेने आपले राजकीय अस्तित्व ठळक केले, तर अजित पवारांनी गड राखले. पण त्या पलीकडे जाऊन ठाकरे + पवार घरात बसले, तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे गावागावात घुसले, हेच राजकीय चित्र नगरपरिषदांच्या निकालांमधून उमटलेले समोर आले.
महापालिका जिल्हा परिषद नगरपरिषद नगरपंचायती पंचायत समिती या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात असे सांगत सगळ्याच पक्षांनी सगळीकडे स्वबळ आजमावले होते. शक्य तिथे महायुती किंवा महाविकास आघाडी झाली, पण प्रत्यक्ष प्रचारामध्ये मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गावागावांमध्ये जाऊन प्रचार केला. त्या उलट उद्धव ठाकरे शरद पवार सुप्रिया सुळे आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे नेते घरात बसून राहिले त्यांनी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराकडे लक्ष सुद्धा दिले नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या प्रचार सभा कुठेच झाल्या नाहीत. बारामती सारख्या ठिकाणी सुद्धा शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे प्रचारात उतरले नाहीत. बाकीच्या ठिकाणी त्यांनी जायचा प्रश्नही उद्भवला नाही. उद्धव ठाकरे यादरम्यान मातोश्री बाहेर पडले नाहीत राज ठाकरे शिवतीर्थाच्या खाली उतरले नाहीत.
या सगळ्याचा परिणाम नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या निकालांमध्ये दिसला. विरोधकांचा सुपडा साफ झाला. त्यातल्या त्यात काँग्रेसने डबल डिजीट जागा मिळवत आपली थोडीफार प्रतिष्ठा राखली. पण सगळ्या महाराष्ट्र तळहातावरच्या रेषांसारखा माहिती असणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मतदारांनी शेवटच्या क्रमांकावर ठेवले. उद्धव ठाकरेंची परिस्थिती सुद्धा फारशी वेगळी राहिली नाही.
सकाळी 11.30 वाजेपर्यंत
भाजप 110, शिंदे यांची शिवसेना 49 अजित पवारांचे राष्ट्रवादी 36 काँग्रेस 34 उद्धव ठाकरे यांचे शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी 9 एवढ्या नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्ष पदांच्या आणि नगरसेवक पदांच्या निवडणूक आघाडीवर होती
Thackeray and Pawar stayed at home; Fadnavis and Shinde went to every village.
महत्वाच्या बातम्या
- ज्ञान, साधना आणि संस्कृतीचा संगम ऋषभायन आंतरराष्ट्रीय परिषदेच्या प्रदर्शनात देवेंद्र फडणवीसांचे ब्राह्मी लिपीत नाव!!
- World Hindu Economic forum : नवोन्मेष, आत्मनिर्भरता आणि समृद्धीचा भारतीय मार्ग हिंदू नीती अर्थव्यवस्थेच्या विचार पद्धतीत!!
- Pakistan Slam : पाकिस्तान म्हणाला- भारतात मुस्लिम महिलेचा हिजाब काढणे चुकीचे, तिथे मुस्लिमांबद्दल द्वेष वाढला
- Donald Trump : ट्रम्प म्हणाले- ‘टॅरिफ’ हा माझा आवडता शब्द; यामुळे 8 युद्धे थांबवली, अमेरिकेने अपेक्षेपेक्षा जास्त पैसे कमावले