प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर ठाकरे आंबेडकर युती होणार आहे उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर या दोन नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद दुपारी होत आहेत पण त्यांच्या युतीबाबत आपल्याला काही माहिती नाही असे सांगून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कानावर हात ठेवले आहेत याचा अर्थ एकीकडे ठाकरे – आंबेडकर युती होत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार का??, असा सवाल तयार झाला आहे. Thackeray – Ambedkar Alliance, may lead to split in MVA in maharashtra
शिवसेनेच्या ठाकरे गटाची आणि वंचित बहुजन आघाडीची युती सोमवारी, २३ जानेवारील घोषित होणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी रविवारी दिली होती. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात शिवशक्ती – भीमशक्तीच्या युतीबाबत चर्चा सुरू आहे. पण या युतीबाबत काही माहिती नाही. मी या भानगडीत पडत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी कानावर हात ठेवले आहेत. त्यामुळे शिवशक्ती – भीमशक्ती युती ही महाविकास आघाडीतली फुटी ठरणार का?, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
शिवसेना आणि वंचित आघाडीच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंनी युतीची घोषणा करावी, अशी आमची भूमिका आहे. पण सध्या युतीबाबत ठाकरे गट आणि काँग्रेस, राष्ट्रवादीत चर्चा सुरू आहे. सर्वांनी एकत्र मिळून युतीबाबत घोषणा करावी, असे उद्धव ठाकरेंचे मत आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. असे असताना शरद पवारांच्या प्रतिक्रियेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
– ठाकरे – आंबेडकर संयुक्त पत्रकार परिषद
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची संयुक्त पत्रकार परिषद आज दुपारी होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. राऊत म्हणाले की, ‘या दोन शक्ती एकत्र याव्यात हे हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होत. ही शिवशक्ती आणि भीमशक्ती या दोन विचारांची युती आहे. सोमवारी शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची घोषणा होईल. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची संयुक्त पत्रकार परिषद होईल. या पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडीचे अन्य दोन घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे नेते नेमकी काय भूमिका घेणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Thackeray – Ambedkar Alliance, may lead to split in MVA in maharashtra
महत्वाच्या बातम्या
- बाळासाहेब ठाकरे जयंती : दारातील जोड्यांची श्रीमंती आणि मातोश्रीचा वारसा
- विरोधकांचे ऐक्य वाऱ्यावर तरीही भाजप उत्तर प्रदेशात सर्व 80 जागा गमावण्याचा अखिलेश यादवांचा अजब दावा
- द ग्रेट खली संघ मुख्यालय रेशीमबागेतील सरसंघचालक स्मृतिमंदिरात नतमस्तक
- 20 गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधी उपलब्ध!; असा करा अर्ज