• Download App
    राज्यात रिक्त शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी सप्टेंबरमध्ये होणार महा - टीईटी। TET exam will be in Sept.

    राज्यात रिक्त शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी सप्टेंबरमध्ये होणार महा – टीईटी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यातील विविध शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा (महा-टीईटी) घेतली जाणार आहे. TET exam will be in Sept.

    पहिली ते पाचवी गट आणि सहावी ते आठवी अशा दोन गटांसाठी परीक्षा असणार आहे. तब्बल दोन वर्षांनंतर शिक्षण विभाग टीईटी घेणार आहे. यासाठी नोंदणी‍ प्रक्रिया आणि त्याचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद लवकरच जाहीर करणार आहे.



    राज्यातील सरकारी, अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सरकारने सहा हजारांहून अधिक शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी मान्यता दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी आयोजित केली जाणार आहे. यामुळे राज्यातील शाळांना मोठ्या प्रमाणात टीईटी परीक्षा देण्याची संधी शिक्षकांना उपलब्ध होणार आहे.

    TET exam will be in Sept.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : महाराष्ट्रातील बडे अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात; विधानसभेत उपस्थित झाला मुद्दा, सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी

    Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंकडून प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध; दीपक काटेच्या कृत्याला पाठिंबा नाही

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे यांना आनंदराज आंबेडकरांची साथ; पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा