• Download App
    TET Exam : राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक; पोलिसांची मोठी कारवाई । TET Exam: State Examination Council Commissioner Tukaram Supe arrested; Major police action

    TET Exam : राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक; पोलिसांची मोठी कारवाई

    पुणे पोलिसांकडून चौकशीनंतर अटकेची कारवाई TET Exam: State Examination Council Commissioner Tukaram Supe arrested; Major police action


    विशेष प्रतिनिधी

    पुणे :  टीईटी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरिक्त पदभार असलेल्या तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

    आरोग्य विभागातील क आणि ड संवर्गातील भरती परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या प्रकरणाचा तपास करत असतानाच म्हाडा परीक्षेचा पेपर फोडण्याचा कट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.



    पुणे पोलिसांच्या सायबर सेलकडून ही माहिती समोर आल्यानंतर म्हाडातील विविध पदांसाठीची परीक्षा रद्द करण्यात आली. या प्रकरणात आरोपी डॉ. प्रीतिश देशमुखसह पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी कारवाईनंतर घेतलेल्या झाडाझडतीत पोलिसांना डॉ. प्रीतिश देशमुख याच्या घरी टीईटी परीक्षेचे ओळखपत्र सापडली होती. त्यामुळे टीईटी परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

    TET Exam: State Examination Council Commissioner Tukaram Supe arrested; Major police action

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ