- राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेंनी जमवली कोट्यवधींची संपत्ती
- म्हाडा पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक प्रितीश देशमुख याच्यासह एजंट संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती.
- त्यांची चौकशी करत असताना त्यांनी 2019-2020 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता (TET) परीक्षेत विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन निकाल बदलल्याचं सांगितलं.
- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तथा अध्यक्ष तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागातील सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्या मदतीने हे केल्याचं त्यांनी सांगितलं.
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे पोलिसांच्या सायबर सेलच्या जाळ्यात अडकलेल्या तुकाराम सुपेंनी मोठी संपत्ती जमा केली आहे. पहिल्या धाडीत तब्बल 90 लाख रुपये जप्त केल्यानंतर पुणे पोलिसांनी दुसऱ्यांदा तुकाराम सुपे आणि त्यांच्या मेहुण्याच्या घरावर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिण्यांसह 2.40 कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली. TET Exam scam: Police find Rs 2.40 crore hidden by Tukaram Supen’s wife and sister-in-law …
आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणाचा तपास करत असताना शिक्षक पात्रता परीक्षेत घोटाळा झाल्याचं पुणे पोलिसांच्या तपासातून समोर आलं होतं. याप्रकरणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आमि शिक्षण विभागात सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या अभिषेक सावरीकर यांना चौकशीनंतर अटक केली होती.
अटकेच्या कारवाईनंतर पुणे पोलिसांच्या सायबर सेलने तुकाराम सुपेच्या घरी धाड टाकली होती. त्यावेळी 88 लाख 49 हजार 980 रोख रक्कम सापडली होती. त्याचबरोबर 5 ग्राम सोन्याचे नाणे, 5 लाख 50,000 हजार रुपयांची एफडी केल्याची कागदपत्रेही पोलिसांनी जप्त केली होती. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा पोलिसांनी कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे तुकाराम सुपे यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी धाड टाकण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या पोलिसांची धाड पडण्याआधी तुकाराम सुपेंची पत्नी आणि मेहुण्याने कोट्यवधी रुपये दुसरीकडे लपवले होते.
पोलिसांच्या हाताला ही रक्कम सापडू नये म्हणून ही रक्कम लपवण्यात आली. मात्र, पोलिसांनी घराची कसून झाडाझडती घेतल्यानंतर तब्बल 2 कोटींची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिणे असे एकूण 2 कोटी 40 लाख रुपयांचं घबाड पोलिसांनी जप्त केलं.
TET परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत पास करण्याचं आश्वासन देऊन त्यांच्याकडून प्रत्येकी 50 ते 1 लाख अशा रकमा घेतल्या. यामाध्यमातून जवळपास 4 कोटी 20 लाख रुपये जमा झाले होते. हे पैसे आरोपींनी आपआपसात वाटून घेतले. यात तुकाराम सुपे यांनी 1.70 कोटी, प्रितीश देशमुख 1.25 कोटी, अभिषेक सावरीकर 1.25 कोटी घेतले.
TET Exam scam : Police find Rs 2.40 crore hidden by Tukaram Supen’s wife and sister-in-law …
महत्त्वाच्या बातम्या
- कोलकाता महापालिका निवडणूक : राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली फेरनिवडणुकीची मागणी, आज भाजपचा निषेध मोर्चा
- कोकणातील आंबा नवी मुंबईत आला हो; खवय्यांसाठी खुशखबर; २५ डझन आवक
- सोलापूरच्या मशिदीत प्रथमच लसीकरण शिबिर, नागरिकांचा भरभरून प्रतिसाद;४०० जणांना डोस
- परीक्षा घेण्यासंदर्भातील सर्व अधिकार स्थानिक प्रशासनाला – उदय सामंत