राज्यात घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. टीईटी 2019 मध्ये सात हजार 780 अपात्र परीक्षार्थी पात्र करण्यात आले होते तर टीईटी 2018 मध्ये 1700 अपात्र उमेदवारांना पात्र केल्याचे आढळून आले आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यात घेण्यात अालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी ) २०१९ च्या परीक्षेत परीक्षेपूर्वीच पेपर फाेडून एजंट मार्फेत ताे परीक्षार्थींपर्यंत पाेहचवून तब्बल सात हजार ७८० अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यात आल्याची धक्कादायक बाब पाेलीसांच्या चाैकशीत उघडकीस आली. मात्र, आता टीईटी -२०१८ च्या परीक्षेतही आराेपींनी गैरव्यवहार केल्याची बाब निष्पन्न झाली असून आतापर्यंत तब्बल १७०० अपात्र परिक्षार्थींना पात्र करण्यात आल्याचे तपासा दरम्यान समाेर आले आहे. यामध्ये मराठवाडा आणि नाशिक परिसरातील अपात्र परिक्षार्थींचे प्रमाण माेठया संख्येने आहे. TET 2018 exam 1700 fake students involved in scam
याप्रकरणात आतापर्यंत एकूण १२ आराेपींना सायबर गुन्हे शाखेच्या पाेलीसांनी अटक केली आहे. सन २०१८ मध्ये शिक्षक पात्रता परीक्षेच्या जाहिरातीनुसार १५/७/२०१८ राेजी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या निकालात आराेपींनी फेराफार केली. परीक्षा आयाेजनाचे कंत्राट जी.ए.साॅफ्टवेअर टेक्नाॅलाॅजी या कंपनीस मिळाले हाेते आणि कंपनीचा संचालक अश्विन कुमार याने राज्य परीक्षा परीषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे, तुकाराम सुपे व शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांचे मदतीने या परीक्षा परीषदेच्या संकेतस्थळावर नियंत्रण असल्याने अपात्र असलेल्या सुमारे ६०० ते ७०० परीक्षार्थींचे प्रत्येकी ५० ते ६० हजार रुपये स्विकारुन सुमारे तीन काेटी रुपये आपसात वाटून घेतल्याचे सुरुवातीला निष्पन्न झाले.
आराेपींनी खाेटा निकाल प्रसिध्द करुन व मुळ निकालाचे यादीतही त्यांचेकडील परीक्षार्थींची नावे घुसवून प्रामणिक परीक्षार्थींची व शासनाची फसवणुक केली. मात्र, या गुन्हयाचा पाेलीसांनी सखाेल तपास केला असता, आराेपींनी आतापर्यंत १७०० अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याची बाब उघडकीस आली आहे.
अश्विनकुमारकडून पैशांचे वाटप
परीक्षेचे आयाेजन करणाऱ्या कंपनीचा मॅनेजर अश्विन कुमार याने टीईटी २०१८ मधील ६०० ते ७०० परीक्षार्थींचे परीक्षेतील मार्क्स वाढविण्यासाठी त्यास मिळालेल्या पाच काेटी रुपयांपैकी दाेन काेटी रुपये जी.ए.साॅफ्टवेअर कंपनीचा संस्थापक गणेशन यास दाेन काेटी रुपये, राज्य परीक्षा परीषदेचा तत्कालीन अध्यक्ष सुखदेव डेरेला २० लाख रुपये तर तुकाराम सुपेला ३० लाख रुपये दिल्याचे चाैकशीत निष्पन्न झाले आहे. या गुन्हयात संताेष हरकळ व अंकुश हरकळ या एजंटनी प्रमुख भूमिका बजावली असून अनेक परीक्षार्थींकडून पैसे घेतलेल्यांची यादी त्यांच्याकडून मिळून आलेली आहे.