वृत्तसंस्था
मुंबई : दिल्ली येथील विशेष पोलिस पथकाने सहा दहशतवाद्यांना अटक केली. या दहशतवाद्यांच्या चौकशीत त्यांनी मुंबई लोकलची टेहळणी केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. Terrorist also watched local trains
देशात बॉम्बस्फोट घडवण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला. यामध्ये दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली. या कटात पकडलेला एक मुंबईचा रहिवासी असून त्याचे नाव जान मोहम्मद असल्याचे समोर आले. सणासुदीच्या काळात दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत हल्ला करण्याचा कट रचला होता. यामध्ये या दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबईची लोकल असल्याची माहिती चौकशीनंतर एका दहशतवाद्याने दिली.
मुंबईच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलासह रेल्वे पोलिस आणि इतर सुरक्षा विभाग सतर्क झाले आहेत. जागोजागी तपासणी करणे, श्वान पथक, बॉम्बशोधक आणि निकामी पथकाद्वारे पाहणी सुरू आहे. स्थानकावरील हमाल, बूट पॉलिश करणाऱ्यांना संशंयित हालचाली दिसल्यास माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
Terrorist also watched local trains
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीतअल्पसंख्यांक शंभर टक्के सुरक्षित, द्वेषाच्या घटना वाढल्याचा आरोप चुकीचा, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंह लालपुरा यांचा निर्वाळा
- महामार्गावरील सुसाट वेगाला आवर, वेग मर्यादा १२० किलोमीटरपर्यंत वाढविण्याच्या केंद्राच्या सूचनेला मद्रास उच्च न्यायालयाची स्थगिती
- भवानीपूरमध्ये सोला अना मशीदीचा आशिर्वाद घेऊन ममता बॅनर्जी यांची प्रचाराला सुरूवात, भाजपने केला घाम फुटल्याचा आरोप
- वीज बिल थकबाकी वसुलीसाठी डाव, सरकारला सावकारी वसुली करायचीय, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप