• Download App
    देशात दहशतवाद - युद्ध माजविण्यासाठी एल्गार परिषदेतील आरोपींची शस्त्रास्त्रे खरेदीची कारस्थाने; NIA च्या आरोपपत्रामध्ये पर्दाफाश|Terrorism in the country - conspiracies of the accused in the Elgar Council to buy weapons to wage war; Exposed in NIA indictment

    Elgar Parish’s Conspiracy; देशात दहशतवाद – युद्ध माजविण्यासाठी एल्गार परिषदेतील आरोपींची शस्त्रास्त्रे खरेदीची कारस्थाने; NIA च्या आरोपपत्रामध्ये पर्दाफाश

    वृत्तसंस्था

    पुणे : पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेवर राष्ट्रीय तपास संस्था NIA ने गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीची जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अशा शैक्षणिक संस्थांमधून आणि विद्यापीठांमधून विद्यार्थ्यांना दहशतवादी कारवाया गुंतवण्यासाठी रिक्रुट केले होते, असा गंभीर आरोप NIA कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात मध्ये करण्यात आला आहे.Terrorism in the country – conspiracies of the accused in the Elgar Council to buy weapons to wage war; Exposed in NIA indictment

    केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या विरोधात युद्ध फेडण्यासाठी शस्त्रास्त्रे खरेदी mp4 आणि 400000 बुलेट्स खरेदीसाठी वार्षिक आठ कोटी रुपये जमा करण्याची कारस्थाने रचण्यात आली होती नेपाळ आणि मणिपूर मधून घातक शस्त्रास्त्रे खरेदीची योजना होती याचे तपशील एन आय एन ए आरोपपत्रात दाखल केले आहेत



    एल्गार परिषद पुण्यामध्ये आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत शर्जील उस्मान या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने संपूर्ण हिंदू समाजावर गरळ ओकली होती. हिंदू समाज आतून सडला आहे. तो अल्पसंख्यांक समाजाविरोधात हिंसाचार माजवून आपले हात घाणीने भरल्यासारखे धुऊन टाकतो, अशा शब्दांमध्ये शरजीलने हिंदू समाजाच्या विरोधात गरळ ओकली होती.

    आता राष्ट्रीय तपास संस्थेने एल्गार परिषदेत संदर्भात संपूर्ण तपास करून 22 जणांविरुद्ध NIA कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे, की या एल्गार परिषदेतून देशाच्या लोकशाहीला, सुरक्षिततेला, ऐक्याला आणि सार्वभौमत्वाला आव्हान देण्यात आले आहे.

    त्याचबरोबर दिल्लीची जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस तसेच अन्य विद्यापीठांमधील काही विद्यार्थ्यांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी “रिक्रुट” करण्यात आले. त्यांनी सरकार, प्रशासन व्यवस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या व्यक्तींना टार्गेट करावे, अशी या विद्यार्थ्यांकडून अपेक्षा ठेवण्यात आली.NIA ने केलेले आरोप एवढे गंभीर आहेत की त्यावर देशद्रोहाच्या कलमानुसार खटला चालू शकतो. कोर्टाचा यासंदर्भातील निर्णय येणे अपेक्षित आहे.

    Terrorism in the country – conspiracies of the accused in the Elgar Council to buy weapons to wage war; Exposed in NIA indictment

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस