• Download App
    तेरे नाम से सुरू, तेरे नाम पे खतम, माझी निष्ठा व राजकारण हे राजसाहेब यांना अर्पित असल्याचे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले|Tere Naam Se Suru, Tere Naam Pe Khatam, My Loyalty and Politics are dedicated to Rajsaheb, explained Bala Nandgaonkar

    तेरे नाम से सुरू, तेरे नाम पे खतम, माझी निष्ठा व राजकारण हे राजसाहेब यांना अर्पित असल्याचे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : रुपाली पाटील यांच्या राजीनाम्यानंतर मनसेला पुण्यामध्ये मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर आता मनसेचा आणखी एक मोठा नेता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. मात्र, ही चर्चा ज्यांच्याबाबत सुरू झाली Tere Naam Se Suru, Tere Naam Pe Khatam, My Loyalty and Politics are dedicated to Rajsaheb, explained Bala Nandgaonkar

    त्या बाळा नांदगावकर यांनी त्याचा इन्कार केला आहे. माझी निष्ठा व राजकारण हे राजसाहेब यांना अर्पित असल्याचे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले असून तेरे नाम से सुरू, तेरे नाम पे खतम असे म्हटले आहे.नांदगावकर यांनी सोशल मीडियावर दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की



    मागील काही दिवसांपासून काही स्वयंघोषित सूत्रांनी माझा पक्ष त्याग व परस्पर पक्ष प्रवेशाची बातमी सुद्धा चालवली. सोशल मीडिया च्या युगात अशा बातम्या किती जोरदार पसरतात हे आपणांस माहीतच आहे.
    मागील अनेक वर्षांत राजकारणात पक्ष निष्ठा, व्यक्ती निष्ठा हे विषय गौण होऊन फक्त आणि फक्त स्वत:च्या फायद्यासाठी वरचेवर पक्ष बदलणारे जरी असले तरी सगळेच असे नसतात.

    खरे तर अशा बातम्या, अफवा या मुद्दामच पेरल्या जातात पण यात अशा बातम्या पेरणारे त्यांचेच हसू करून घेतात. माझी निष्ठा व राजकारण हे राजसाहेब यांना अर्पित आहे व राहील. त्यामुळे त्याबद्दल मला काहीच सांगायची गरज नाही.

    कारण जे मला ओळखतात त्यांना काहीच सांगायची आवश्यकता नाही व जे ओळखून पण खोडसाळपणा करतात त्यांना सांगून काही फायदा नाही. एक जुने हिंदी गाणे माज्या राजकारणाबद्दल व राजसाहेबांच्या आणि माज्या संबंधाबद्दल सर्व एका कडव्यात सांगून जाते.

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाशिक, औरंगाबाद आणि पुणे दौरा सुरू आहे. नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्यादरम्यान मी राज ठाकरे यांच्या सोबत होतो. पुण्याला जेव्हा राज ठाकरे आले तेव्हा मी मुंबईला परतलो.

    मुंबईत १८ तारखेला माझ्या मतदार संघात कार्यालयाचे उदघाटन साहेबांच्या हस्ते असल्याने मी तयारीसाठी मुंबईत आलो आहे. मी पुण्याच्या दौऱ्याला गेलो नसल्याने बाळा नांदगावकर स्वगृही परतणार अशा बातम्या आणि काही मेसेज फिरत आहेत, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

    Tere Naam Se Suru, Tere Naam Pe Khatam, My Loyalty and Politics are dedicated to Rajsaheb, explained Bala Nandgaonkar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा