वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जहांगीरपुरी भागात शनिवारी संध्याकाळी हनुमान जयंतीनिमित्त मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीनंतर उसळलेल्या हिंसाचारात पोलिसांनी मुख्य आरोपी अन्सारसह २१ जणांना अटक केली. याशिवाय २ अल्पवयीन मुलांनाही अटक करण्यात आली आहे. सुमारे २१ जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. गृह मंत्रालयाने CRPF आणि RAF च्या पाच अतिरिक्त कंपन्या तैनात केल्या आहेत. Tense calm in Jahangirpuri area
पोलिसांनी रविवारी १४ आरोपींना न्यायालयात हजर केले, तेथून १२ आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले, तर गोळीबारातील आरोपी अन्सार आणि अस्लम पोलिस कोठडीत आहेत. सध्या परिसरात तणावपूर्ण शांततेचे वातावरण आहे. गृह मंत्रालयाने खबरदारी म्हणून CRPF आणि RAF च्या आणखी पाच कंपन्या पाठवल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला आहे.
उत्तर-पश्चिम जिल्ह्याच्या पोलिस उपायुक्त उषा रंगनानी यांनी सांगितले की, हिंसाचारात आठ पोलिस कर्मचाऱ्यांसह नऊ जण जखमी झाले आहेत. त्यातील एक गोळी एसआयच्या हातात लागली. रविवारी काही नवीन व्हिडिओ समोर आले असून, त्या आधारे तपास सुरू आहे. अमन समित्यांशी बोलून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त दीपेंद्र पाठक (विशेष सीपी कायदा आणि सुव्यवस्था) रविवारी दिवसभर घटनास्थळी राहिले. परिसरात पूर्ण शांतता असून गुन्हेगारांचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी २०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि व्हिडिओ ताब्यात घेतले आहेत. या व्हिडिओंच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे.
Tense calm in Jahangirpuri area
महत्त्वाच्या बातम्या
- Corona Return! : महाराष्ट्रात कोरोनाचे पुनरागमन? एप्रिल महिन्यात आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू
- दिल्लीपाठोपाठ दक्षिणेतील दोन राज्यांत हिंसाचार : कर्नाटकात पोलीस ठाण्यावर दगडफेक, 12 पोलीस जखमी; आंध्रमध्ये दोन समुदायांत हाणामारी, 15 जखमी
- Bulldozers Against Mafias : मानवी हक्काचा धोशा लावत जमियत उलेमा ए हिंदची बुलडोजर कारवाई विरोधात सुप्रीम कोर्टात धाव!!
- Hanuman Jayanti Riots : जहांगीरपुरी दंगलीच्या आरोपीने दिल्लीच्या रोहिणी कोर्टात नेताना दाखविली “पुष्पा”ची मस्ती!!