• Download App
    दहा हजार कोटींचे पॅकेज अपुरे; अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा सरकारला आहेर|Ten thousand crore package insufficient; Food and Drug Administration Minister Dr. Rajendra Shingane

    WATCH : दहा हजार कोटींचे पॅकेज अपुरे; अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा सरकारला आहेर

    विशेष प्रतिनिधी

    बुलडाणा : साधारणत: मागील तीन आठवडे एक महिन्यापासुन महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अतिवृष्टी आणि कुठे ढगफुटीसारखे सुद्धा प्रकार मोठ्या प्रमाणावर झालेले आहे, आणि सातत्याने सुद्धा पाऊस पडून राहिलेला आहे, Ten thousand crore package insufficient; Food and Drug Administration Minister Dr. Rajendra Shingane

    आठवड्यामध्ये यासंदर्भात राज्य सरकारने दहा हजार कोटींचे पॅकेज आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर केले आहे. परंतु, परिस्थिती पाहता हे पॅकेज अपुरे आहे, असा आहेर अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी राज्य सरकारला दिला.



    पॅकेज जाहीर झाल्यानंतर सुद्धा साधारणतः चार दिवसाने सातत्याने पावसाला सुरुवात सुद्धा झाली आहे,आणि शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल तुर असेल इतर सर्व पिक असतील, त्या सगळ्या पिकांची मोठी हानी झाली आहे. मला सर्व माहिती आहे की,१० हजार कोटींचे पॅकेज हे राज्यातील शेतकऱ्यांना पुरेस नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाडा, अमरावती विभागामधील शेतकऱ्यांना अधिकच पॅकेज कसे मिळेल ?

    यासंदर्भात चर्चा करणार आहोत आणि मागणी सुद्धा करणार आहोत आणि जाहीर झालेल पॅकेजचे पैसे ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावेत, यासाठी सुद्धा निश्‍चितपणे प्रयत्न केले जातील अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

    •  शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींचे पॅकेज अपुरे
    • पॅकेज जाहीर झाल्यावर पुन्हा अतिवृष्टीने नुकसान
    •  सोयाबी, तुर असेल इतर पिकांची मोठी हानी
    •  ते भरून काढण्यासाठी पॅकेज वाढविण्याची गरज
    •  मंत्रिमंडळात याबाबत आवाज उठविणार
    •  पॅकेजचे पैसे ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची मागणी

    Ten thousand crore package insufficient; Food and Drug Administration Minister Dr. Rajendra Shingane

    Related posts

    न्यायालयाच्या निर्णयानंतरही मनाेज जरांगेंचा अडेलतट्टूपणा कायम, आझाद मैदानातून उठणार नसल्याची भूमिका

    मराठा आंदोलनामुळे मुंबईत वाहतूक कोंडी; मुंबई पोलिसांनी जारी केली ट्रॅफिक ॲडव्हायझरी!!

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंच्या गणपतीचे दर्शन; ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटीवर लगावला टोला